महिलांना घरात घुसून मारहाण, दोन गटांत तुफान हाणामारी

Ahmednagarlive24
Published:

कर्जत : तालुक्यातील नेटकेवाडी येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी आठ लोकांना अटक केली आहे.

तालुक्यातील नेटकेवाडी येथे आज सकाळी ९:०० च्या सुमारास गावात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. याबाबत अजय बापू धांडे व गहिनीनाथ भिवा धांडे यांनी परस्परविरोधांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

अमर बापू धांडे (वय २३) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत सुदाम भिवा धांडेंसह १४ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, वडील बापू धांडेंसह आपल्या डोळ्यांत चटणी टाकून गजाने, काठीने व दगडाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.

आपण वडिलांसह पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो असताना मागे बहीण व आईला पाच सहा महिला- पुरुषांनी घरात घुसून मारहाण करत गळयातील सोन्याची चेन काढून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून कर्जत पोलीस स्टेशनला १४ लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेटकेवाडी येथील गहिनीनाथ भिवा धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बापूराव धांडे यांच्यासह इतर १० व्यक्तींनी डोळयांत चटणी टाकून गजाने, काठीने व दगडाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.

या वेळी गळयातील चेन व मोबाईल हिसकावून घेतला. तर महिलांना घरात घुसून मारहाण केली. यावरून कर्जत पोलीस स्टेशनला १० ज़णांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment