पाथर्डी : एसटीच्या तिकीटासाठी सुटे पैसे द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एसटीला मोटारसायकल आडवी घालून व एसटीत चढून एसटीच्या वाहकाला शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केली. पटेलवाडा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली.
वाहक संजय सुडके यांच्या फिर्यादीवरून सुरेश परसराम पवार,राहुल परसराम पवार व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी आगाराचे वाहक संजय सुडके हे घाटपिंप्री ते पाथर्डी ही एसटीबस घेऊन येत होते.

आल्हणवाडी येथे दोघे पवार एसटीत आले व तिकिटासाठी पाचशे रुपयांची नोट दिली. वाहकाने पैसे सुटे नसल्याचे सांगून त्यास गाडीतून खाली उतरवून दिले.
याचा राग धरून राहुल, सुरेश व आणखी एक अनोळखी इसम यांनी मोटारसायकल वरून एसटीचा पाठलाग करून पटेलवाडा फाटा येथे एसटीला मोटारसायकल आडवी घालून एसटीत चढले व वाहक संजय सुडके यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी वाहक सुडके यांनी तक्रार नोंदविली आहे.
- पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! 2.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतुन मिळणार 5 लाख
- सावधान ! कुलरचा स्फोट होण्याचे प्रकार वाढले; नेमके कारण काय? उपाय काय? वाचा एका क्लिकमध्ये
- सोन्याच्या किमतीत पुन्हा 1,250 रुपयांची घसरण ! 11 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा…
- माणसाला किती तासांची झोप आवश्यक असते? ‘या’ नव्या संशोधनाने आता सगळेच चक्रावले
- आंबा घेताय पण तो गोड आहे की आंबट..? अगदी सोप्पा ट्रिक्सने तुम्हाला आंब्यातील गोडवा कळेल