Hill Station: पावसाळ्यात तुमची हिल स्टेशनला भेट द्यायची इच्छा आहे का? तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील ‘हे’ हिल स्टेशन देईल तुम्हाला अविस्मरणीय अनुभव

Ajay Patil
Published:
saputara

Hill Station:- जेव्हा तुम्ही पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एखादी ट्रीप प्लान करतात तेव्हा प्रामुख्याने निसर्ग सौंदर्य असलेल्या ठिकाणी म्हणजेच डोंगरदऱ्या किंवा प्रसिद्ध असलेला धबधबा, समुद्रकिनारी इत्यादी गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य देतात व त्यासोबतच वेगवेगळ्या हिल स्टेशनला भेट देण्याची देखील योजना बनवतात.

कारण पावसाळ्याच्या कालावधीत अशा निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे म्हणजेच एक स्वर्गसुख अनुभवण्यासारखे असते. त्यामुळे पावसाच्या कालावधीत असंख्य पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यासाठी ट्रीप प्लान करतात.

तुमची देखील अशाच प्रकारे या पावसाळ्यामध्ये एखाद्या हिल स्टेशनला जायची इच्छा असेल व त्या ठिकाणी तुम्हाला पावसाळ्यातील निसर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही सापुतारा या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. त्यामुळे आपण या लेखात या सापुतारा हिल स्टेशन विषयीची माहिती बघणार आहोत.

 कसे आहे सापुताऱ्याचे स्वरूप?

सापुताराला गुजरात राज्यातील एकमेव आणि प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या दक्षिण सीमेवर असलेल्या डांग जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये सापुतारा हे हिल स्टेशन वसलेले असून ते समुद्रसपाटीपासून साधारणपणे तीन हजार सहाशे फूट उंचीवर आहे. सापुतारा या हिल स्टेशनचे सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही पावसाळा व्यतिरिक्त कोणत्याही ऋतूत या ठिकाणी गेला तरी त्याचे मनमोहक रूप तुमचे मन वेधून घेते.

या ठिकाणी असलेले सनसेट पॉईंट, रोझ गार्डन पर्यंत अनेक पॉईंट्स आहेत ज्यातून तुम्ही निसर्गाची अनुभूती घेऊ शकतात. एवढेच नाही तर सापुताराला गेल्यानंतर तुम्हाला जवळपास इतर काही ठिकाणी देखील पर्यटनासाठी उत्तम अशी ठिकाणे आहेत. हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण असून उत्तम पॅनोरेमिक व्ह्यू साइड असल्यामुळे वर्षभरात पर्यटक येथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात.

तसेच या ठिकाणी असलेले प्राणी जीवन म्हणजेच वाइल्ड लाईफ देखील खूप प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्हाला द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीची शेती मोठया प्रमाणावर बघायला मिळते व ही फळे तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळतात. या ठिकाणचे आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बांबू पासून वेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात व अशा प्रकारच्या वस्तूंची खरेदी करायला या ठिकाणी खूप गर्दी असते.

 सापुताऱ्यापासून जवळ आहे बोटॅनिकल गार्डन

सापुतारा पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले बोटॅनिकल गार्डन देखील खूप महत्त्वाचे असून ते जवळपास 24 हेक्टर मध्ये पसरलेले आहे. या गार्डनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूचे अनेक प्रकार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तर 1400 पेक्षा अधिक प्रकारच्या वेली देखील आहेत. बाबूंच्या प्रकारांमध्ये बियर बॉटल बांबू तसेच चायनीज बांबू, सोनेरी बांबू या इथल्या खास बांबूच्या प्रकारांची उदाहरणे आहेत.

तसेच सापुतारा जवळ असलेला गिरा धबधबा पाहण्यासाठी देखील हा कालावधी खूप उत्तम आहे. सापुताऱ्यापासून 70 किलोमीटरवर तुम्ही महल जंगलात गेला तर या ठिकाणी तुम्हाला वन्य प्राण्यांचे जीवन अनुभवता येते. परंतु वर्षातून ठराविक कालावधीत  तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात व या ठिकाणी जाण्यासाठी वन खात्याची तुम्हाला विशेष परवानगी घ्यावी लागते.

या पर्यटन स्थळांशिवाय सापुताऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर नाशिक रोडवर असलेला हतगड किल्ला देखील खूप प्रसिद्ध आहे. अर्धशक्ती पिठ म्हणून ओळखले जाणारे वणीचे सप्तशृंगी मंदिर देखील अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून तुम्ही सापुताराच्या ट्रिप मध्ये अनेक निसर्गसौंदर्याने सजलेले अनेक पर्यटन स्थळे पाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe