Maruti Best Mileage Car: मारुतीच्या ‘या’ कारांपैकी एक कार घ्या व 22 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज मिळवा; होईल पैशांची बचत

Ajay Patil
Published:
best mileage car

Maruti Best Mileage Car:- तुम्हाला देखील चांगले मायलेज देणारी कार घ्यायची असेल व तुम्हाला मारुती सुझुकीची कार घ्यायची असेल तर या कंपनीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अनेक कार मायलेजच्या बाबतीत उत्तम आहे.

कारण मायलेज ही संकल्पना कारच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असल्याने आणि त्याचा थेट संबंध पैशांशी येत असल्यामुळे कार घेताना मायलेज बघणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता आपण या लेखामध्ये मारुती सुझुकीच्या अशा काही कार पाहणार आहोत ज्यांचे मायलेज हे 22 किलोमीटर पेक्षा जास्त आहे व त्या परवणारे किमतीत देखील मिळतात.

 या आहेत मारुतीच्या 22 किलोमीटर पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या कार

1- मारुती सुझुकी स्विफ्ट मारुती सुझुकीची स्विफ्ट देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली असून या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे व ही कार 4300 आरपीएम वर 111.7nm टॉर्क जनरेट करते.

या कारबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 24.8 किमी प्रतिलिटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह 25.75 किमी प्रतिलिटर मायलेज देते. या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 49 हजार रुपये आहे.

2- मारुती सुझुकी सेलेरिओ मारुती सुझुकीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार पैकी सेलेरिओ ही कार देखील उत्तम असून त्यामध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजन असून ते 67 पीएस पावर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते.

हे कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 25.24 आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 26.68 किमी प्रति लिटर मायलेज देते. या कारची किंमत पाच लाख 36 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत सात लाख पाच हजार रुपया पर्यंत जाते.

3- मारुती सुझुकी अल्टो के 10- हे देखील मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार असून या कारमध्ये कंपनीने 1.0 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे व ते 65 बीएचपी कमाल पावर आणि 89 एनएम कमाल टॉर्क जनरेटर करते.

हे कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 24.39 आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 24.90 किमी प्रति लिटर मायलेज देते. या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 44 हजार रुपये आहे.

4- मारुती सुझुकी डिझायर या कारमध्ये कंपनीने 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून चे 80.46 बीएचपी पावर आणि 111.7 न्यूटन मीटरचा पिक टॉर्क जनरेट करते.ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 22.4 आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 22.61 किमी प्रति लिटर मायलेज देते.

कारची सुरुवातीची किंमत सहा लाख 57 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत नऊ लाख 39 हजार रुपये पर्यंत आहे.

5- मारुती सुझुकी बलेनो मारुती सुझुकीची ही कार देखिल सर्वाधिक विक्री होणारी असून यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असून जे 90 अश्वशक्ती आणि 113 एनएम पिक टॉर्क जनरेट करते.ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 22.35 व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 22.94 किमी मायलेज देते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत सहा लाख 66 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत नऊ लाख 88 हजार पर्यंत जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe