डॉलरचे मूल्य घसरल्याने सोन्याचे दर वाढले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-मागील आठवड्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली.

या बातमीने कच्चे तेल आणि बेस मेटलच्या दरांना काहीसा आधार मिळाला. तर पिवळ्या धातूची मागणी काहीशी कमी झाली. तथापि, डॉलरचे मूल्य घसरल्याने सोन्याचे दर वाढले. कोरोना मदत पॅकेजच्या आशेनेही कच्च्या तेलाच्या दरांना आणखी आधार दिला.

याच वेळी कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीमध्ये घट दिसून आली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: अमेरिकेकडून आणखी मदतीच्या आशेने सोन्याचे दर ०.७५% वाढले व ते १९१२.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. तर डॉलरचे दर वाढले. अमेरिकेत, हाऊस स्पीकर नँसी पेलोसी आणि ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्हन म्युचिन हे दोन्ही पक्षांमधील दरी भरून काढण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. अमेरिकेकडून अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीची आशा गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळेही पिवळ्या धातूच्या किंमतींना आणखी आधार मिळाला.

सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजाला गती मिळाली व सोन्यातील आणखी नफ्यावर चाप बसला. यामुळे विदेशातील मागणीत वाढ झाल्याचे संकेत मिळाले व गुंतवणुकादारांची जोखिमीची भूकही वाढली. जगभरात कोव्हिड-१९ च्या धोकादायक वाढीमुळे तसेच अमेरिकी डॉलरच्या अवमूल्यनामुळेही सोन्याच्या दरांना आधार मिळाला. आजच्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर उच्चांकी स्थिती गाठतील, असा अंदाज आहे.

कच्चे तेल: डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गुंतवणूकादारांमध्ये आशेचा किरण दिसून आला. परिणामी डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ५.८% नी वाढले व ३९.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अमेरिकेकडून अतिरिक्त कोरोना पॅकेजच्या आशेने कच्च्या तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. नॉर्वेयन तेल संघटना आणि युनियनमधील वेतनावरील चर्चा अपयशी ठरल्यामुळे सिक्स नॉर्वेयन किनारपट्टीवरील तेल व वायू क्षेत्र बंद राहिले.

कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पुन्हा लॉकडाऊन झाल्याने क्रूडच्या अर्थकारणावर आणखी परिणाम झाला.तेलाच्या मागणीतील घसरणीचे व्यवस्थापन करण्यासाठी जानेवारी २०२१ पासून ओपेक तेल उत्पादन वाढवण्यास नकार देत आहे. तसेच घसरत्या डॉलरच्या मूल्यामुळेही कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तेलाच्या किंमतींत फार सुधारणा होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

बेस मेटल: जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये कोव्हिड-१९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या चिंतेने एलएमईवरील बेस मेटलच्या किंमती लाल रंगात स्थिरावल्या. चीनच्या साप्ताहिक सुटीमुळे मागणीत घट झाली. परिणामी दरांबाबतही सावधगिरी बाळगली गेली. तथापि, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्याच्या बातम्यांमुळे औद्योगिक धातूंच्या दरांना काहीसा आधार मिळाला. सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजात मजबूत सुधारणा झाल्याने विदेशातील मागणी वाढल्याचे तसेच उद्योग आधारीत वृद्धी झाल्याचे संकेत मिळाले. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट्सनुसार, चीनचा अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स सप्टेंबर २०२० मध्ये ५१.५ पर्यंत गेला.

तांबे: कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत जगभरात प्रचंड वाढ झाल्याने लाल धातूच्या मागणीतही घट झाली. परिणामी एलएमई कॉपरचे दर ०.३७% नी घसरले व ६५२८.५ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. तथापि, अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या आशेने तसेच डॉलरच्या अवमूल्यनामुळे औद्योगिक धातूंना आणखी आधार मिळाला. आजच्या सत्रात तांब्याचे दर एमसीएक्सवर फारसे सुधारणार नाहीत, असा अंदाज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment