अनोखे आहे भारतातील ‘हे’ हिल स्टेशन; या ठिकाणी ढग येतात जमिनीवर, सुंदर पर्वत आणि हिरवीगार जंगले मनाला घालतात भुरळ

Published on -

भारत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समृद्ध असून अनेक हिल स्टेशन तसेच थंड हवेचे ठिकाणे आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला दिसून येतात व याकरिता वर्षभरात लाखोंच्या संख्येने देश विदेशातून पर्यटक भारतातील विविध ठिकाणांना भेट देत असतात. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक निसर्गाने समृद्ध असलेल्या ठिकाणे तसेच हिल स्टेशनला भेट देण्यासाठी ट्रीप प्लान करतात.

अशा प्रकारच्या ट्रीप प्रामुख्याने मित्र किंवा नातेवाईक तसेच कुटुंबासोबत प्लान केले जातात. जर तुमचा देखील या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एखाद्या हिल स्टेशनला जायचा प्लान किंवा इच्छा असेल तर तुम्ही राणीखेत या भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये असलेल्या एका छोट्याशा हिल स्टेशनला भेट देऊ शकतात.

राणीखेत हे भारतातील उत्तराखंड राज्यातील कुमाऊ प्रदेशामध्ये वसलेले एक आकर्षक डोंगरी शहर असून त्या ठिकाणी असलेली सुंदर पर्वत, हिरवीगार जंगले आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा  आलेल्या पर्यटकांना आकर्षित करतो. तुम्हाला जर शांत पर्वतीय जीवन एकदम जवळून पाहायचे असेल आणि समजायचे असेल तर तुमच्यासाठी राणीखेत हा उत्तम पर्याय आहे.

 या पावसाळ्यात राणीखेतला द्या भेट

जर आपण भारतातील इतर हिल स्टेशन पाहिले तर त्यामध्ये राणीखेत हे एक सुंदर व छोटेसे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली एनसीआरच्या अगदी जवळ हे हिल स्टेशन असून तुम्ही दिल्लीवरून कारने देखील या ठिकाणी जाऊ शकतात. दिल्ली आणि राणीखेत यादरम्यानचे अंतर साडेतीनशे किलोमीटर आहे व साधारणपणे आठ ते दहा तासाचा हा प्रवास आहे.

याशिवाय तुम्हाला सर्व प्रमुख उत्तर भारतातील प्रमुख शहरांमधून राणीखेतला जाण्यासाठी टॅक्सी देखील उपलब्ध होतात. जर तुम्हाला थेट या ठिकाणी जायला कुठून बस मिळाली नाही तर तुम्ही काठगोदाम किंवा अलमोडा मार्गे राणीखेतला जाऊ शकतात. राणीखेत या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे देखील तुम्हाला बघायला मिळतात व या ठिकाणचा इतिहास व अध्यात्माने मन अगदी समृद्ध होते.

राणीखेत या ठिकाणी असलेले झुला देवी मंदिरामध्ये अनेक श्रद्धाळू येतात व हे मंदिर त्याच्या अद्वितीय घंटा आणि त्या ठिकाणी असलेला सुंदर परिसर याकरिता विशेष प्रसिद्ध आहे. जेव्हा तुम्ही राणीखेत या ठिकाणी याल तेव्हा असलेल्या हिरव्यागार जंगलांमध्ये वसलेल्या काली देवी मंदिराला देखील भेट देऊ शकतात व येथून तुम्ही हिमालयाच्या नवीन दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. जेव्हा तुम्ही या ठिकाणी येतात तेव्हा तुम्हाला असे वाटते की ढग तुमच्या पायांचे चुंबन घेत आहेत.

 येथील चौबटिया गार्डन आहे विशेष

उत्तराखंड राज्यातील अलमोडा जिल्ह्यातील राणीखेत या ठिकाणापासून दक्षिणेस दहा किलोमीटर अंतरावर हे गार्डन आहे. या ठिकाणच्या बागा विविध प्रकारच्या फळांनी बहरलेल्या आहेत व इथे आल्यानंतर तुम्हाला अनेक सुगंधी फुले पाहण्याची संधी देखील मिळते.

गार्डन पाहण्यासाठी तुम्हाला काही शुल्क मोजावे लागते व या ठिकाणी प्रति व्यक्ती 20 रुपये असे तिकीट दर असून हे उद्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस खुले असते.

तसेच हे गार्डन पाहिल्यानंतर तुम्ही भालू धरणाला भेट देऊ शकतात. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 120 वर्षाहून अधिक जुने असून 1903 मध्ये इंग्रजांनी या धरणाची उभारणी केली होती. चौबटीया गार्डन पासून हे धरण तीन किलोमीटरवर अनिकेत पासून अवघे 11 किलोमीटर अंतरावर आहे.

 राणीखेतला आल्यानंतर शॉपिंग करायची असेल तर आहेत भरपूर पर्याय

राणीखेत हे शांत डोंगरी शहर केवळ पर्यटकांना त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने मंत्रमुग्ध करते असे नव्हे तर ते खरेदीचा आनंददायक अनुभव देखील तुम्हाला त्या ठिकाणी देते.

राणीखेतला गेल्यानंतर तुम्ही तिथल्या स्थानिक हस्तकलेपासून ते स्वादिष्ट स्थानिक उत्पादनापर्यंत अनेक वस्तूंची खरेदी करू शकतात. राणीखेतच्या बाजारपेठांमध्ये सरदार बाजार रोड, मॉल रोड तसेच रेजिमेंटल बाजार, कुमाऊ रेजिमेंट सेंटर व अलमोडा बाजार हे राणीखेत मधील खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe