अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. आता शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याने सुशांतच्या बहिणींवरच गंभीर आरोप लावले आहेत.
सुशांतच्या मालमत्तेसाठी त्यांनी त्याला ड्रग्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘सुशांत सिंहची बहिण त्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषध देत होती.
ज्यामुळे तो ड्रग्सच्या आहारी जाईल आणि त्याची प्रॉपर्टी हडप करता येईल? असा त्यांचा डाव होता का? या अँगलने तपास होण्याची गरज आहे.
त्यामुळं मी मुंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात तपास करण्याची विनंती केली,’ असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय.
या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं बोललं गेलं.
दरम्यान ठाण्यातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नवी शंका उपस्थित केलीये. सुशांत सिंग राजपूत
याच्या कुटुंबीयांनी त्याच्या संपत्तीसाठी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलंय का? असा सवाल प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय. याबाबत तपासणीची मागणी प्रताप सरनाईक यांनी ट्विटरच्या माध्यमातुन केलीये.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved