अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी उद्या गुरूवारी (ता. ८) महापालिकेकडून शट-डाऊन घेण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुसर्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ही दुरुस्ती सुरू राहणार आहे.
त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेने बदल केला आहे. बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर परिसर, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, स्टेशन रोड परिसर, सारसनगर, स्टेशन रोड, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याणरोड परिसर, शिवाजीनगर भागात गुरूवारी (ता. ८) पाणीपुरवठा नाही.
मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको, बुरूडगाव रोड येथे शुक्रवारी (ता. ९) पाणीपुरवठा होण्याऐवजी शनिवारी (ता. १०) पाणीपुरवठा होईल.
शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, खिस्तगल्ली, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, आगरकर मळा, सारसनगर भागाला शनिवारी (ता. १०) पाणीपुरवठा होण्याऐवजी रविवारी (ता. ११) पाणीपुरवठा होईल.
नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved