वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरन रचत आंदोलन, हाथरस प्रकरणाचा केला निषेध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  वंचित बहुजन आघाडी ने आज स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत आंदोलन करत हाथरस प्रकरणाचा निषेध केला.

यावेळी योगी सरकारच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्मशानभूमीत सरन रचत तेथे बसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले.

हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत आंदोलन केले. यावेळी संघटनेने विविध मागण्या केल्या.

सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमुर्ती मार्फत विशेष चौकशी समिती गठित करण्यात येऊन ३० दिवसाच्या आत चार्जशीट तयार करण्यात यावे,

सदर खटला उत्तरप्रदेश बाहेर मुंबई , चेन्नई , कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, पीडित मुलीचा अंतिम संस्काराच्या नावाखाली महत्वपुर्ण पुर्नतपासणीचे पुरावे नष्ट केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी,

पोलीस अधिक्षक व त्यांना आदेशीत करणार् मंत्र्यावर ३०२,१२० अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी. या घटनेतील फिर्यादी व त्यांचे कुंटुबीय व साक्षीदारांना संपुर्ण संरक्षण देण्यात यावे.

वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुचनेने जिल्हयासह राज्य भारत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल ,

असा इशारा मा.युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, मा शहर जिल्हा महासचिव सुनिल शिंदे, विजय गायकवाड, विनोद गायकवाड, जीवन कांबळे, संदिप गायकवाड आदी सहभागी झाले होते

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment