युवकांसाठी रोजगार निर्मिती केंद्रीभूत ठेवून शहर काँग्रेसने काम करावे – आ. डॉ. सुधीर तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  नगर शहरातील युवकांसमोर रोजगार हा सगळ्यात मोठा समस्येचा विषय आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसने पुढाकार घेत शहरामध्ये काम करावे, असे आवाहन काँग्रेसचे विधानपरिषदेचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.

शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी निर्णयांच्या कायद्याला विरोध करण्यासाठीच्या सह्यांच्या मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे,

जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दानिशभाई शेख, नगर तालुका युवक काँग्रेसचे अक्षयभाऊ कुलट, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहोकले, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, चिरंजीवभाऊ गाढवे,

प्रवीणदादा गीते, प्रसाद शिंदे सर, अरुण धामणे, शानूभाई शेख, इमरान बागवान, वाहिद शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सह्यांच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी नगर शहर आणि नगर तालुका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक देखील यावेळी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडली.

यावेळी नगर शहर एमआयडीसी परिसरातून १०,००० कामगारांच्या सह्यांचे निवेदन गोळा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. आ.तांबे यांनी पहिली स्वाक्षरी करत या मोहिमेचा शुभारंभ यावेळी केला. आ.तांबे म्हणाले की, कामगारांच्या गळचेपीचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे.

त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशा वेळी त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आधार देण्याची भूमिका आपण घेतली आहे. यासाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसने घेतला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांनी,

पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचत त्यांचा आवाज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे असे आव्हान या वेळी आ. तांबे यांनी केले. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,

युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरा बरोबरच नगर शहरात देखील आम्ही ही मोहीम राबवणार आहोत. नगर शहरातील गोरगरीब, कष्टकरी, कामगार वर्गाच्या पाठीशी उभे राहत त्यांना बळ देण्याचे काम आम्ही करणार आहोत. हे काम करत असताना शहरातील मोठ्या कंपन्या आणि स्थानिक उद्योजक यांना देखील

सहकार्याची भूमिका ही काँग्रेसची असणार असल्याचे काळे यांनी नमूद केले. यावेळी प्रशांत वाघ, अॅड. अजित वाडेकर, शंकर आव्हाड देवेंद्र कडू पाटील, गणेश आपरे, गणेश लांडगे, अंकित सोनवणे, भाऊसाहेब कुलाल आदिवासी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment