Mumbai Tourist Place: पावसाळ्यात कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जा मुंबई फिरायला; मायानगरीतील ‘ही’ ठिकाणे तुम्हाला करतील मंत्रमुग्ध

Ajay Patil
Published:

Mumbai Tourist Place:- महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर मायानगरी म्हणून देखील ओळखले जाते. तसेच या शहराला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा मुंबईच्या सौंदर्य आणि वैभवात आणखीनच भर टाकतो. तसेच मुंबई शहर आणि परिसरामध्ये असंख्य प्रमाणामध्ये पर्यटन स्थळे असल्याने देशातीलच नव्हे तर विदेशातील लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी मुंबईला भेट देत असतात.

पावसाळ्यामध्ये तर मुंबईचे रूप आणखीनच खुलून दिसते. ज्याप्रमाणे मुंबई शहरांमध्ये अनेक प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. अगदी त्याचप्रमाणे मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील पर्यटन स्थळांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही देखील कुठे बाहेर जायचा प्लान बनवत असाल तर मुंबई हे ठिकाण तुमच्यासाठी महत्त्वाचे राहील व जर तुम्ही मुंबईला गेलात तर या लेखात दिलेली ठिकाणे अवश्य पहावी.

 पावसाळ्यात मुंबई फिरायला जा आणि ही ठिकाणी आवर्जून पहा

1- कान्हेरी लेणी मुंबईतील बोरिवली जवळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक प्रसिद्ध लेणी म्हणजे कान्हेरी लेणी होय. ही लेणी काळाकुट्ट असलेल्या दगडामध्ये साकारलेली आहे व भारताच्या बुद्ध काळातील या लेण्या असल्यामुळे त्या कालावधीतील कला आणि संस्कृती कशी होती ही आपल्याला जवळून अनुभवता येते. पावसाळ्यामध्ये कान्हेरी लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची लाखोंच्या संख्येने गर्दी होते.

2- गोराई बीच– हे ठिकाण देखील बोरिवलीमध्ये असून इथला समुद्रकिनारा मनाला मोहून टाकणारा असून खूप प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये जेवढे समुद्रकिनारे आहेत त्यातील सर्वात स्वच्छ आणि शांत असलेला समुद्रकिनारा म्हणून गोराई बीचची ओळख आहे. तुम्हाला जर गोराई बीचला जायचे असेल तर तुम्ही बोरिवली वेस्ट येथून बस किंवा रिक्षाची मदत घेऊन जाऊ शकतात.

3- ग्लोबल पागोडा बोरिवलीमध्ये असलेले जे काही गोराई बीच आहे व त्या ठिकाणी हा ग्लोबल विपश्यना पागोडा असून हे ठिकाण देखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ज्यांना दररोजच्या ताणतणावापासून आणि दैनंदिन आयुष्यातून थोडीशी शांतता हवी असेल अशी व्यक्ती ग्लोबल पॅगोडाला भेट देऊ शकतात.

या ग्लोबल पॅगोडाला जगातील एक आधुनिक आश्चर्य असे देखील म्हटले जाते. जे काही पागोडा स्थापत्यशैली होती तिचा हा एक अनोखा आविष्कार असून यामुळे बौद्ध धर्माची एक वेगळी ओळख संपूर्ण जगासमोर येण्यास मदत झालेली आहे. या ठिकाणी शांत असलेल्या विपश्यना केंद्रामध्ये तुम्ही मेडिटेशन देखील करू शकतात.

4- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक जगातील महत्त्वाचे व प्रसिद्ध असे राष्ट्रीय उद्यान असून ते बोरिवली या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये जे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचे ठिकाणे आहेत त्यापैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एक आहे.

तुम्ही जर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला वाघापासून तर चार शिंगे असलेले काळवीट तसेच हरीण, सांबर, रानडुक्कर, साप व इतर अनेक प्राणी बघायला मिळतात. पावसाळ्याचा कालावधीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी एक महत्त्वाचा कालावधी असून यावेळेस त्या ठिकाणची सुंदरता जास्त खुलून दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe