अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगातील महान संस्कृती असलेल्या भारत देशात महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
यामुळे आता हि नारी आक्रमक झाली आहे. महिलांचे रक्षण करण्यास सरकार, पोलीस प्रशासन अकार्यक्षम असल्यास महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार व हत्याप्रकरणी तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. तसेच माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्या दलित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील महिलांनी सुपे येथे नगर- पुणे माहामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला. देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी.
तसेच आरोपींना तात्काळ फाशी द्यावी गुन्ह्याची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी, अशीही मागणी महिलांनी केली. आंदोलन करत या महिलांनी सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी यावेळी रोहिणी वाघमारे, शुभांगी पठारे, राजश्री पवार, प्रांजल शिंदे, सुमन कोठावळे, प्रणाली सरोदे, मयुरी शिंदे, निकिता औटी, पल्लवी औटी, प्राजक्ता गाडगे, सानिया शेख, मुस्कान सय्यद आदी महिला उपस्थित होत्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved