सध्या बाईक उत्पादक कंपन्यांकडून अनेक वैशिष्ट्य असलेल्या बाईक तयार केल्या जात आहेत. परंतु यामध्ये इलेक्ट्रिक बाइक उत्पादनाची संख्या देखील आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर व पर्यावरण हिताच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बाइकचे महत्व अनन्यसाधारण असल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्या कार पासून तर बाईक पर्यंत व स्कूटर इत्यादी वाहनांची निर्मिती इलेक्ट्रिक स्वरूपात करताना आपल्याला दिसून येत आहेत.
परंतु याही पुढे जात बजाज ऑटोने नुकतीच त्यांची सीएनजी बाईक लॉन्च केली व संपूर्ण जगातील दुचाकी बाजारपेठेमध्ये एक नावलौकिक प्राप्त केला. कारण जगातील पहिली सीएनजी बाईक म्हणून या बाईकला ओळखले जात आहे. त्यापाठोपाठ आता दुचाकी उत्पादक क्षेत्रातील एक महत्त्वाची अशी कंपनी टीव्हीएस देखील लवकरच आपली पहिली सीएनजी दुचाकी जुपिटर 125 CNG सह बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
टीव्हीएस लॉन्च करणार TVS CNG 125cc स्कूटर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बजाज नंतर आता टीव्हीएस ही कंपनी देखील लवकरच आपली पहिली सीएनजी दुचाकी ज्युपिटर 125 सीएनजी सह बाजारामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत असून मिळालेल्या माहितीनुसार टीव्हीएस कंपनीच्या माध्यमातून या सीएनजीच्या ज्युपिटर 125 स्कूटरवर काम सुरू आहे. टीव्हीएसची ही सीएनजी स्कूटर बाजारपेठेत आल्यानंतर ती फॅक्टरी फीट सीएनजी किटसह असलेली जगातील पहिली स्कूटर ठरणार आहे.
याबाबत ऑटो कार इंडियाच्या अहवालात म्हटले गेले आहे की, टीव्हीएस कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून विविध पर्यायी इंधन तंत्रज्ञानावर काम करत असून त्याच कामाचा किंवा प्रयत्नांचा भाग म्हणून कंपनीने हा सीएनजी पर्याय आता डेव्हलप केलेला आहे. ही सीएनजी स्कूटर कशी राहील किंवा त्यामध्ये कोणते फीचर्स येतील याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
ज्याप्रमाणे टीव्हीएस ची फ्रीडम 125 बाईक आहे त्याप्रमाणे ज्युपिटर 125 सीएनजी आणि पेट्रोल टाकेसहित येईल अशी एक अपेक्षा आहे. आपण टीव्हीएसच्या फ्रीडम 125 या बाईकचा विचार केला तर ती दोन किलोग्रॅम सीएनजी टॅंकसह 102 किमी पर किलो इतके सीएनजी मायलेज देते.
कधी येईल ही स्कूटर मार्केटमध्ये व काय राहील किंमत?
जर आपण ऑटोकार इंडियाचा अहवाल पाहिला तर त्यामध्ये नमूद केले आहे की, ही स्कूटर 2024 या वर्षाच्या शेवटी किंवा 2025 या वर्षाच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. जर आपण टीव्हीएस ज्युपिटर 125 सीएनजी स्कूटर ची किंमत पाहिली तर ती साधारणपणे 95 हजार ते एक लाख दहा हजार रुपये एक्स शोरूम किमतीसह असू शकते.