तरुणास कुऱ्हाडीने मारहाण

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव शिवारात एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. श्रीरंग आश्रु मेटे (वय ६०) यांनी फिर्यरद दाखल केली.

बाळू कुंडलिक जगदाळे यांच्याविरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोज रोज तु आमच्या सुनेच्या घरी का येतो? अशी विचारणा श्रीरंग मेटे यांनी केली असता त्याचा राग धरुन बाळु जगदाळे याने फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन मारहाण केली.

मारहाणीत मेटे जखमी झाले. आरोपीने फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. पुढील तपास पोहेकॉ खेडकर हे करीत आहेत.