Ahmednagar News : महिलांवरील अत्याचारासंदर्भात अनेक प्रकरणे अहमदनगरमधून अलीकडील काळात समोर आले होते. आता द्राक्षाच्या बागेत खुरपणी करत असलेल्या महिलेवर नराधमाने शेतातच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेनंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे.
समजलेली अधिक माहिती अशी : श्रीरामपूर गणेशनगर रस्त्यालगत वाकडी शिवारात सदर पीडित महिला द्राक्षाच्या बागेत खुरपणी करत होती. त्या दरम्यान आरोपी त्या ठिकाणी आला
व त्याने या ३५ वर्षीय महिलेस उसाच्या ऊसाचे शेतात ओढत नेत बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर पीडीत महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीसात फिर्याद दिली. पोलिसांनी सदर
आरोपीस पकडून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आला आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत कार्यवाही केल्याने आरोपीस फरार होण्यास संधी मिळाली नाही व आरोपीस अटक झाली. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
लालटाकी परिसरात पोलिसांनी पकडले गोमांस
राज्यात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीस आणि गोमांस विक्रीस बंदी असतानाही नगर शहरातील लालटाकी झोपडपट्टी परिसरात एका गाळ्यात गोमांस विक्री केली जात होती. ही माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली आहे.
सदरची कारवाई गुरुवारी दुपारी २.२० च्या सुमारास करण्यात आली असून यामध्ये ३० किलो गोमांस, एक लोखंडी वजन काटा व १ सत्तूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पो.कॉ. दत्तात्रय कोतकर यांच्या फिर्यादी वरून रिजवान जमील कुरेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.