नगरमध्ये चाललंय काय? शेतातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच दहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना उघड

प्रेमाच्या जाळ्यात ओढून दहावीत असताना घरी नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलगी अकरावीत गेल्यानंतर पुन्हा पाठलाग करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्याने तिला भर रस्त्यात चापटीने मारहाण केली.

Ahmednagarlive24 office
Published:
atyachar

Ahmednagar News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून दहावीत असताना घरी नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलगी अकरावीत गेल्यानंतर पुन्हा पाठलाग करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

मुलीने नकार दिल्याने तिला भर रस्त्यात चापटीने मारहाण केली. अत्याचाराची घटना डिसेंबर २०२३ मध्ये, तर मारहाणीची घटना मंगळवारी दि.९ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी संबंधित आरोपी विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत एका १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पीडिता गेल्या वर्षी दहावीत शिकत होती. तिची सोशल मीडियावरून एकाशी मैत्री झाली. एक दिवस त्याने तिला दुचाकीवरून घरी नेले. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. त्याने घरी आलीच आहेस तर घर बघून घे, असे म्हणत तिला घरात नेले व अत्याचार केला.

याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडिता अकरावीत गेली. त्याने फुन्हा मुलीचा पाठलाग सुरू केला. बुधवारी सदर मुलगी कॉलेजमधून घरी जात होती.

पाठीमागून तो दुचाकीवरून आला व त्याने मुलीला दुचाकीवर बसण्यास सांगितले. मुलीने नकार दिला, त्याचा त्याला राग आला व त्याने तिला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शेतात अत्याचार
द्राक्षाच्या बागेमध्ये गवत खुरपणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने उसात ओढत नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा करण्याचा खळबळजनक प्रकार वाकडी, ता. राहाता येथे घडला आहे.

याप्रकरणी द्राक्ष बागायतदार किशोर कारभारी यणगे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी १२ च्या सुमारास सदर महिला एकटीच द्राक्ष बागेत गवत खुरपायचे काम करत असताना शेताचा मालक किशोर यणगे हा तेथे आला.

आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत यणगे याने या महिलेचा हाथ पकडला व द्राक्ष बागेच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतात जबरदस्तीने या महिलेला ओढत नेले. उसाच्या शेतात तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe