खा. लंके यांच्याकडून वारकऱ्यांना गरमागरम वडापाव ! चहा, बाटलीबंद पाणी आणि आरोग्य सेवाही

Ahmednagarlive24
Published:

पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी  खासदार नीलेश लंके यांच्यावतीने गरमागम वडा पाव, बाटलीबंद पाणी, चहा तसेच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वतः खा. लंके हे प्रत्येक वारकऱ्यास वडापाव, चहा वितरीत करीत आहेत.

दरवर्षी खा. लंके यांच्याकडून पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना अल्पोपहार, पिण्याचे पाणी तसेच आरोग्य सेवा देण्यात येते. यंदा गेल्या शुक्रवारपासून परीते जिल्हा सोलापूर येथे वारकऱ्यांसाठी वडापाव, चहा पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अल्पोपहार वितरणाची व्यवस्था करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी खा. लंके यांनी परीते येथे जात मैदानाची पाहणी करून मंडप तसेच अल्पोपहार तयार करण्यासाठीची तयारी केली. पिण्याचे बाटलीबंद पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.

शुक्रवारी सकाळपासून अल्पोपहार वितरणास प्रारंभ करण्यात आला. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने गरमागरम वडापाव तसेच चहाचा आस्वाद घेतला. गरज असलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधाही देण्यात आल्या.

अल्पोपहार वितरणासाठी विविध जबाबदाऱ्या नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या शंभर कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्या असून प्रत्येक कामामध्ये खा. लंके हे देखील आपले योगदान देत आहेत. शनिवारी मा. मंत्री प्राजक्त तनपुरे, युवा नेते भगिरथ भालके, शिवसेनेचे नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी अल्पोपहार केंद्रास भेट दिली.

खा. लंके यांच्या हाती झाडू

अल्पोपहार वितरणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये कचरा झाल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी स्वतः हाती झाडू घेऊन संपूर्ण मंडप साफ केला. पाणी बाटल्यांचे वाहन आल्यानंतर बॉक्स उतरवून घेण्यासाठीही खा. लंके यांनी पुढाकार घेतला.

दिंडी चालक, विणेकऱ्यांचा सत्कार

अल्पोपहारासाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडीचालक तसेच विणेकऱ्यांचा खा. लंके यांच्या हस्ते शाल,श्रीफळ तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. खा. लंके यांच्यासमवेत अनेक वारकऱ्यांनी छायाचित्रे काढली.

मंडपातच लंके यांची विश्रांती

पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अल्पोपहाराचे वितरण झाल्यानंतर खा. नीलेश लंके हे मंडपामध्येच भोजन करून तिथेच विश्रांती घेतात. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या  कार्यकर्त्यांचीही मंडपातच विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे.

१५ आचारी

वडा पाव तसेच भजे व चहा तयार करण्यासाठी १५ आचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी २० महिलाही आहेत. प्रत्येक वारकऱ्यास गरमा गरम वडापाव मिळाला पाहिजे याची काळजी  घेण्यात येत असून प्रत्येक व्यवस्थेवर खा. लंके हे स्वतः लक्ष ठेऊन आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe