सध्या भारतातील वाहन बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी वेगवेगळी कार मॉडेल लॉन्च केली असून ग्राहकांना त्यांचा आर्थिक बजेटनुसार कार खरेदी करणे आता सोपे झाले आहे. यामध्ये देशातील महिंद्रा अँड महिंद्रा तसेच मारुती सुझुकी सारख्या नामवंत कंपन्यांनी देखील अनेक कार भारतामध्ये लॉन्च केलेले आहेत.
त्यामुळे जर एखाद्याला कार खरेदी करायची असेल तर मात्र अनेक कार मॉडेल बाजारामध्ये असल्यामुळे कोणती कार घ्यावी याबाबत बऱ्याच जणांचा गोंधळ उडताना दिसतो. कारण प्रत्येक कंपनीच्या विविध कारमध्ये फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत वेगवेगळे असून त्यांच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत.

त्यामुळे बरेच ग्राहक गोंधळात पडताना दिसून येतात. जर आपण कार मॉडेल पाहिले तर यामध्ये भारतातील प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने गेल्या काही दिवसा अगोदर भारतामध्ये आपली कॉम्पॅक्ट एसयुव्ही XUV 3XO लॉन्च केलेली होती.
आपण महिंद्रा कंपनीच्या कार सेगमेंट पाहिले तर त्यामध्ये ही कार अधिक पावरफुल असून उत्कृष्ट फीचर्स या कारमध्ये देण्यात आलेले आहेत. या कार सोबतच मारुती सुझुकी या प्रसिद्ध कंपनीची ब्रेझा देखील उत्कृष्ट फीचर्स असलेले कार आहे. त्यामुळे या लेखात आपण या दोन्ही कार पैकी तुलनात्मक दृष्ट्या कोणती कार खरेदी करण्यासाठी चांगली राहील हे आपण थोडक्यात समजून घेऊ.
कार खरेदी करताना Mahindra XUV 3XO खरेदी कराल की मारुती Brezza?
1- किंमत आणि इंजिन यामधील फरक– जर आपण या दोन्ही कारच्या बेस मॉडेलच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये महिंद्रा XUV 3XO ची किंमत सात लाख 49 हजार रुपयापासून सुरू होते तर ब्रिझा या मारुती सुझुकीच्या कारची किंमत आठ लाख 34 हजार रुपयापासून सुरू होते. महिंद्राच्या कारमध्ये ११९७ सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे तर ब्रिजामध्ये 1462CC क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.
2- मायलेज आणि पावर मधील फरक– महिंद्राच्या XUV 3XO चे इंजिन 109 हॉर्स पावरची पावर जनरेट करू शकते तर ब्रिजा या कारचे इंजिन फक्त 101 हॉर्स पावर जनरेट करते. महिंद्राची एक्सयुव्ही 3XO हे कार 18.89 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते तर मारुतीची ब्रिझा 17.38 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते.
3- इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलेल्या फिचरमधील फरक– दोन्ही कारमध्ये रियर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर तसेच पावर स्टेरिंग, पावर विंडो यासारखी वैशिष्ट्ये तुम्हाला पाहायला मिळतात.
महिंद्राच्या कारमध्ये ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरला हिटेड सीट्स ऑफर केल्या जातात. जर सेफ्टी बदल पाहिले तर महिंद्राच्या एक्सयूव्ही 3XO कारमध्ये सहा एअरबॅग मिळतात तर ब्रिजामध्ये दोनच एअर बॅग उपलब्ध आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेली एबीएस आणि ईबीडी फिचर तुम्हाला दोन्ही कारमध्ये मिळतात.