जमिनीच्या वादातून अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याने एकाच मृत्यू ; नगर जिल्ह्यातील घटना

Published on -

Ahmednagar News : सध्या अनेकवाद जमिनीवरून होतात. याच जमिनीवरून अनेकदा सखे भाऊ देखील एकमेकांचे वैरी होतात. मात्र अद्याप यातून कोणीच काही बोध घेत नाही. अशाच जमिनीच्या वादातून मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे ही घटना घडली. यापक्ररणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर गणेश अर्जुन आव्हाड (वय ३५, रा. महालक्ष्मी हिवरे) असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी गणेश अर्जुन आव्हाड यांच्या मावशीचे व मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप, (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) यांचे जमिनीवरून एकमेकांचे वाद होते.

दरम्यान घरासमोर मोटारसायकलमधून बाटलीमध्ये पेट्रोल काढत असताना आरोपींनी मागील वादाच्या कारणावरून तसेच मावशी व आरोपी यांच्यातील जमिनीच्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हातातील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडले असता, आरोपी मारुती मोहन सानप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील काडीपेटीने पेटून दिले.

अशी फिर्याद उपचार घेत असताना गणेश अर्जुन आव्हाड (वय ३५, रा. महालक्ष्मी हिवरे) यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप, (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात होता.

मात्र फिर्यादी पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना शुक्रवारी दि.१२ जुलै रोजी मयत झाले. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहेत .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe