दूध दरवाढ आंदोलन ; ‘या’ ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवून दूध हंडी फोडली

Published on -

Ahmednagar News : दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे.

संघर्ष समितीने राज्यातील दूधसंघ प्रतिनिधीसमोर ठेवलेल्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव देण्याची मागणी दूधसंघ प्रतिनिधींनी फेटाळून लावल्याने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध हंडी फोडून दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला पाठिंबा दिला.

अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १५ जुलै ते २१ जुलै या काळात राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. आज सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे. या आंदोलनात डॉ.अजित नवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News