एखादी कल्पना सत्यात उतरवण्यासाठी ती कल्पना अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये वास्तवात उतरवून नंतर तिला मोठे स्वरूप देणे हे यशाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. सध्या इंटरनेटचा जमाना असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आता सगळे कामे अगदी एका क्लिकवर करू शकतात. जगातील कुठल्याही कोपऱ्यात किंवा कुठल्याही कोपऱ्यातली माहिती तुम्हाला एका सेकंदात मिळते.
इंटरनेटच्या प्रगतीमुळे जग अगदी जवळ आले आहे. तसेच आपल्याला माहित आहे की सध्या ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे आता बँकिंग देखील सोपे झाले आहे. याच ऑनलाईन प्रक्रियेचा एक भाग म्हणून ऑनलाईन किराणा दुकान किंवा ऑनलाईन सुपर मार्केट देखील आता मोठ्या प्रमाणावर भारतात प्रसिद्ध होताना आपल्याला दिसून येत आहेत.
जर एकंदरीत आपण भारताच्या ऑनलाईन किराणा दुकानातील लोकप्रिय ब्रँड पाहिला तर आपल्या समोर बिगबास्केट हे नाव अगोदर येते. आपल्याला माहिती आहे की बिगबास्केट हे भारतातील सर्वात मोठे सुपर मार्केट असून भारतातील 40 शहरांमध्ये आज या बिगबास्केट ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक खाद्यपदार्थांची विक्री केली जाते.
या बिगबास्केटची स्थापना करण्यामागे हरी मेनन या व्यक्तीचा खूप मोठा हात असून अखंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी बिग बास्केटचा प्रवास शून्यापासून इथपर्यंत आणला आहे.
हरी मेनन यांनी केला बिग बास्केटचा श्री गणेशा
जर आपण हरी मेनन यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचा जन्म 1963 यावर्षी मुंबईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यानंतर त्यांचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूल, लवडेल येथून बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून बी टेक आणि नंतर एमबीए करिता त्यांनी कार्णेगी मेलॉन त्यामध्ये प्रवेश घेतला होता.
यांना शिक्षणामध्ये इतका रस होता की त्यांनी याही पुढे जात ओक्लाहोमा स्टेट यूनिवर्सिटीच्या माध्यमातून ऑपरेशन रिसर्च मध्ये औद्योगिक अभियांत्रिकी मध्ये एमएस देखील केले. त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी कोंसीलियम मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून केली व 2004 मध्ये त्यांनी त्यांचा उद्योजकीय प्रवासाला सुरू करून ब्रिस्टलकोन येथे कार्पोरेटर रणनीती कशी असते हे जाणून घेण्यासाठी मार्केटिंग क्षेत्रात प्रवेश केला.
बिग बास्केट सुरू करण्याची कल्पना कशी सुचली?
बिग बास्केटचा श्री गणेशा करण्याअगोदर त्यांनी व त्यांचे मित्र मिळून फॅबमार्ट बरोबर काही प्रयोग केले व ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गजांचे ते अग्रदूत आहे. सुरुवातीला या क्षेत्रामध्ये त्यांना अपयश आले व दुकानांमध्ये अनेक बदल असून देखील मात्र त्यांनी या क्षेत्रात चिकाटी ठेवली व त्याचा फायदा त्यांना झाला.
याचाच परिणाम म्हणून फॅबमार्ट ब्रँड अंतर्गत 300 स्टोअर ची स्थापना करण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर हळूहळू डिसेंबर 2011 मध्ये त्यांनी ऑनलाइन अन्न आणि किराणा कंपनीचे स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून बिग बास्केट डॉट कॉमची स्थापना केली. सध्या जर आपण बिग बास्केट पाहिले तर भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन सुपर मार्केट असून भारतातील जवळपास 40 शहरांमध्ये या माध्यमातून किराणामाल,
ताजी फळे तसेच भाज्या, ताजे मांस तसेच दुग्धजन्य पदार्थ तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ, गोरमेंट, खाद्यपदार्थ असे विविध पदार्थ विकले जातात. या माध्यमातून देशातील 1000 पेक्षा अधिक ब्रँडचे विविध प्रकारचे उत्पादन शहरी भागामध्ये विकले जातात.
उद्योग क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक म्हणून हरी मेनन यांना अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. त्यांचा हा पारंपारिक किरकोळ विक्रीपासूनचा व्यवसाय आज ऑनलाईन किराणा मालाच्या बाजारपेठेपर्यंत पोचला असून अनेक उद्योजकांसाठी हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.