कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा लागतो व या पैशाचे स्वरूप किंवा भांडवलाचे स्वरूप तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर व्यवसायाची सुरुवात करणार आहात यावर अवलंबून असते. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो लाखो रुपये टाकून सुरू करायला हवा असे नसते. नेमके बाजारामध्ये कशाची मागणी आहे व त्या मागणीला हेरून जर व्यवसायाची आखणी केली तर तुम्हाला कमीत कमी भांडवलात देखील महिन्याला चांगला नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाची सुरुवात करता येऊ शकते.
जर आपण अशा छोट्या व्यवसायांची यादी पाहिली तर ती खूप मोठी तयार होईल. परंतु यामध्ये नेमक्या व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये असा एक व्यवसाय बघणार आहोत जो तुम्हाला सुरू करण्यासाठी कमीत कमी भांडवल लागेल व पैसा मात्र तुम्ही आयुष्यभर या माध्यमातून चांगला मिळू शकाल.
पॅकिंग व्यवसाय देईल तुम्हाला आयुष्यभर भरपूर पैसा
पॅकेजिंग उद्योग म्हणजेच पॅकिंग व्यवसाय सध्या खूप महत्त्वाचा असून सध्या समाजामध्ये ऑनलाइन शॉपिंगचा जो काही ट्रेंड दिसून येतो त्या ट्रेंडमुळे पॅकेजिंग उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावर गती मिळण्यास मदत झालेली आहे. अनेक खाद्यपदार्थ तसेच पेये, एफएमसीजी उत्पादनाच्या वितरणाकरिता चांगली पॅकिंग करणे आवश्यक असते
. शेतीमधील फळांची पॅकिंग देखील आवश्यक असते व आकर्षक पॅकिंग करून बरीच फळे बाहेरच्या मार्केटमध्ये पाठवली जातात. पॅकेजिंगचा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून सुरु करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. मात्र त्यातून नफा हा भरघोस मिळतो.
तुम्हाला जर पॅकिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला दोन प्रकारे सुरू करता येऊ शकतो. यातील पहिला प्रकार जर पाहिला तर तुम्ही थेट कंपन्यांशी संपर्क साधून त्या कंपन्यांची उत्पादने पॅकिंग करण्याचे काम करू शकतात. यातील दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही जवळच्या घाऊक विक्रेत्याकडून किंवा किरकोळ विक्रेत्याकडून पॅकिंगचे काम घेऊ शकता.
परंतु यातील पहिला प्रकार म्हणजेच कंपन्यांकडून पॅकिंगचे काम हे सगळ्यात फायद्याचे ठरते. कारण या प्रकारामध्ये कंपनीकडून तुम्हाला पॅकिंगच्या सर्व साहित्य पुरवले जाते. तुम्हाला फक्त त्या कंपनीचे जे काही उत्पादन असेल ते व्यवस्थित पॅक करावे लागते व कंपनीला त्यांनी दिलेल्या वेळेत परत पाठवावे लागते. विशेष म्हणजे या प्रकारामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही.
कंपन्यांकडून पॅकेजिंगचे काम कसे मिळवाल?
यासाठी तुम्हाला संबंधित कंपनीचे मालक किंवा व्यवस्थापक यांना भेटावे लागेल व यासंबंधी तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. समजा तुमच्या जवळपास कुठलाही प्रकारची कंपनी नसेल तर तुम्ही इंटरनेटच्या साह्याने
अशा कंपनीचा शोध घेऊ शकता जे तुम्हाला अगदी घरी बसून ऑनलाईन पॅकिंगचे काम देऊ शकतील. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही अशा बऱ्याच कंपन्या शोधू शकतात जे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काम देऊ शकतात. त्यामध्ये ई कॉमर्स क्षेत्रातील ज्या काही कंपन्या आहेत त्यांना जास्तीत जास्त पॅकिंग आवश्यक असते.
पॅकिंग व्यवसायातून कमाई किती होते?
हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही अगोदर कुठल्याही प्रकारचे यंत्र खरेदी न करता हाताने देखील पॅकिंगचे काम सुरू करू शकतात. जसा जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल व तुमचे आर्थिक कमाई वाढेल तशी तुम्ही पॅकिंग मशीन खरेदी करून हा व्यवसाय वाढवू शकतात. साधारणपणे सुरुवातीला पाच ते सहा हजार रुपये टाकून तुम्ही हा व्यवसाय आरामात सुरू करू शकतात व प्रत्येक महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवू शकतात.