चुकीला माफी नाही …! मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचा नेमका काय व कोणाला इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील.‎ नगरकरांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी‎ आपला प्रयत्न असेल. तसेच चुकीला माफी नाही. जे चुकीचे काम करतील त्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही. असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला.

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकताच आपल्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकाला आहे. त्यानिमित्त त्यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी आयुक्त डांगे बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, शहरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आपले प्राधान्य असेल, त्याचसोबत नगरकरांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी‎ प्रयत्न आहे. मात्र चुकीला माफी नाही. जे चुकीचे काम करतील त्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही.

शहराचा एक नागरिक म्हणून मनपाचा‎ कारभार करताना नागरिकांना‎ भेडसावणाऱ्या अडीअडचणी व‎ समस्यांचा अभ्यास केला जाईल. ‎असे देखील ते म्हणाले. मात्र आयुक्त यशवंत डांगे यांनी हा इशारा कोणाला दिला यावरून आता चांगलीच चर्चा होत आहे.

दरम्यान अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी ८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता.

लिपिक श्रीधर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार झाले आहेत. त्यांचा अद्याप देखील पत्ता लागलेला नाही.

दरम्यान यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले, शहरातील पाणी प्रश्न गंभीर आहे. काही भागात चार ते पाच दिवसात पाणी येते. ते देखील पूर्ण दाबाने येत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी खूप हाल होतात. त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न‎ करणे गरजेचे आहे. यावर आयुक्तांनी प्रश्न सोडवण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe