अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलेले आहे. आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती.
मात्र मराठा क्रांती मोर्चाने विरोध केल्यानंतर राज्य पूर्व सेवा परीक्षा घेण्यावर सरकार ठाम राहिले असून, रविवारी होणार्या या परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रावर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकार्यांच्या नियंत्रणाखाली तेथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात विविध केंद्रांवर ही परिक्षा रविवारी (दि. 11) सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत होत आहे. या काळात परीक्षा केंद्र व परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. या परीक्षा रद्द कराव्यात अन्यथा त्या होऊ देणार नाहीत, असा इशारा मध्यंतरी देण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली चोख बंदोबस्ताची व्यवस्था महत्त्वपूर्ण मानली जात आहे. परीक्षा उपकेंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणलाही बेकायदेशीर रित्या प्रवेश करता येणार नाही. परीक्षेशी संबंधित असणारे म्हणजे परिक्षार्थी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही केंद्रात येण्यास प्रतिबंध राहणार आहे.
तसेच परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी रविवारी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत त्या त्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved