Cheapest 7 Seater Car:- जेव्हा कोणीही कार खरेदी करायला जाते तेव्हा सगळ्यात अगोदर कमीत कमी किंमत आणि चांगले मायलेज व इतर वैशिष्ट्य असलेली कार खरेदी करतात व दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कुटुंबात किती सदस्य आहेत यानुसार देखील कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते.
बरेच कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या जास्त असते व संपूर्ण कुटुंबाला ते बाहेर जायचे राहिले तर एकाच कारमध्ये जाता येईल या दृष्टिकोनातून देखील कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. मोठ्या कुटुंबासाठी खास करून सात सीटर कार खरेदी करणे परवडते.
जर आपण भारतीय कार बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये अनेक सात सीटर कार असून त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले आहेत व त्यांची फीचर्स देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे या लेखामध्ये आपण सर्वात स्वस्त 7 सीटर कारबद्दल माहिती घेणार आहोत जे मोठ्या कुटुंबासाठी परवडणारे आहेतच. त्यांच्या किमती देखील दहा लाख रुपयांच्या आत आहे.
या आहेत दहा लाख रुपयांच्या आतील मोठ्या कुटुंबासाठी फायद्याच्या 7 सीटर कार
1- रेनॉल्ट ट्रायबर– रेनॉल्ट कंपनीची ट्रायबर एक महत्वपूर्ण 7 सीटर कार असून ती आइस कुल व्हाईट, सिडर ब्राऊन, मेटल मस्टर्ड, मूनलाइट सिल्वर, ब्लॅक ग्रुप इत्यादी रंगांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 84 लिटरची बूट स्पेस असून त्यातील तिसरी लाईन फोल्ड करून 625 लिटर पर्यंत ती वाढवता येते. या कारमध्ये एक लिटर नैसर्गिक रित्या एक्स्पिरिटेड तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे ७२ पीएस पावर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कार मध्ये चार एअरबॅग्स, ईबीडी सह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल स्टार्ट असिस्ट, रियर पार्किंग सेन्सर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाखापासून ते आठ लाख 98 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
2- मारुती एर्टिगा– ही कार पर्ल मेटॅलिक ऑबर्न रेड, मॅटॅलिक मॅग्मा ग्रे, पर्ल मिडनाईट ब्लॅक, पर्ल आर्टिक व्हाईट, डिग्निटी ब्राऊन आणि पर्ल मेटॅलिक ऑक्सफर्ड ब्लू इत्यादी रंगांमध्ये उपलब्ध असून या कारचा बूट स्पेस 209 लिटरचा आहे. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असून जे 103 पीएस पावर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते.
या कारचे सीएनजी व्हेरियंट 88 पीएस पावर आणि १२१.५ एनएम टॉर्क जनरेट करते. या कारचा पेट्रोल प्रकार 20.51 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते तर सीएनजी प्रकार 26.11 किलोमीटर पर किलोग्रॅम चे मायलेज देते. या कारमध्ये डुएल एअर बॅग, मागील पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक्स स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि हिल होल्ड असिस्ट सारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.
याशिवाय वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्लेसह 7 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आलेला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 69 हजार ते 13 लाख 3 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
3- महिंद्रा बोलेरो निओ– ही कार नेपोलि ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्वर, हायवे रेड, पर्ल व्हाईट, डायमंड व्हाईट आणि रॉकी बेज इत्यादी रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारचा बूट स्पेस 384 लिटरचा देण्यात आला असून या कारमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजन असून जे 100 पीएस पावर आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करते.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये ड्युअल फ्रंट एयर बॅग, रिव्हर्स असिस्ट सह मागील पार्किंग सेन्सर आणि आयसोपिक्स चाइल्ड माउंट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 90 हजार ते बारा लाख पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
4- मारुती इको– ही कार मटालिक ग्लीस्टेनिंग ग्रे, पर्ल मिडनाईट ब्लॅक, मेटॅलिक सिल्की सिल्वर आणि सॉलिड व्हाईट इत्यादी रंगाच्या पर्यायांमध्ये ही कार येते. मारुती इको मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. जे 81 पीएस पावर आणि 104.4nm टॉर्क जनरेट करते. तसेच मारुतीची ईको सीएनजी वेरियंटमध्ये इंजिन ७२ पीएस पावर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 19.71 किलोमीटर पर लिटर आणि सीएनजी व्हेरियंटचे मायलेज 26.78 किलोमीटर पर किलो इतके आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये डुएल फ्रंट एअरबॅग,
फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि मागच्या बाजूला पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख बत्तीस हजार रुपये ते सहा लाख 58 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.