पावसाळ्यात मस्तपैकी वीकेंडला तुमच्या कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन बनवा! फक्त ‘या’ 5 ठिकाणी भेट द्या आणि निसर्गाच्या रंगात रमून जा

Ajay Patil
Published:

पावसाळ्याचा कालावधी म्हणजे जणू काही जीवनातील एक सर्वात उत्तम कालावधी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सगळीकडे पसरलेली हिरवाई, रिमझिम पडणारा पाऊस आणि मधूनच जोराच्या येणाऱ्या पावसाच्या धारा आणि या सगळ्या थंड आणि आल्हाददायक वातावरणात आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत केलेला प्रवास हा एक अविस्मरणीय असा अनुभव असतो.

त्यामुळेच बरेचजण पावसाळ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पर्यटन स्थळी आणि निसर्गाने नटलेल्या डोंगरदरी आणि गड किल्ले या ठिकाणी भेट देतात. बरेचजण विकेंडला बाहेर फिरण्याचा किंवा बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लान आखतात व असे प्लान प्रामुख्याने कुटुंबासोबत आखले जातात.

तुम्हाला जर वीकेंडची खास मजा घ्यायची असेल तर महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणी आहेत. परंतु त्यातील काही ठिकाणे हे इतरांपेक्षा नैसर्गिक दृष्टीने खूपच वेगळी असून त्या ठिकाणी तुम्ही भेट दिली तर निसर्गाचा आनंद आणि निसर्ग काय असतो हे तुम्हाला अगदी जवळून अनुभवता येते.

 कुटुंबासोबत विकेंडला बाहेर फिरायला जायचा प्लान असेल तरी या पाच ठिकाणांपैकी करा निवड

1- तापोळा कुटुंबासोबत फिरण्यासाठी महाबळेश्वर जवळील हे एक उत्तम पर्यटन स्थळ असून एक छोटेसे गाव आहे. हे गाव निसर्गरम्य स्थळ असून लोकांची फारच कमी गर्दी असल्याने त्या ठिकाणी शनिवार आणि रविवारी जर तुम्हाला शांततेत दिवस घालवायचा असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे.

तसेच तुम्ही तापोळ्याला गेल्यावर ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला तंबूच्या घरात राहण्याचा अनुभव घेता येतो.कारण तशा प्रकारची व्यवस्था तापोळ्यात करण्यात आलेली आहे. तापोळापासून जर तुम्ही थोडे पुढे गेले तर स्ट्रॉबेरीच्या बागा दिसतात व या ठिकाणच्या लालचुटुक स्ट्रॉबेरी मनाला मोहून टाकतात.

2 डहाणू तुम्ही जर मुंबईसारख्या शहरात राहत असाल किंवा दुसऱ्या शहरात राहत असाल आणि दररोजच्या त्या ठिकाणच्या ट्रॅफिक आणि गजबजाटाला त्रासून गेला असाल तर शनिवार आणि रविवारची सुट्टी घालवण्यासाठी डहाणू एक उत्तम ठिकाण आहे. आपल्याला माहित आहे की, डहाणू एक उत्तम समुद्रकिनारा आहेस

आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही सीफूड खाण्याचा आनंद घेऊ शकतात. मुंबईमध्ये जेवढ्या बीचेस आहेत त्यापेक्षा स्वच्छ आणि शांत बीच म्हणून डहाणू बीच ओळखले जाते. या ठिकाणी असलेले बीच साईड रिसॉर्ट मुक्काम करण्यासाठी तुम्ही बुक करू शकता व त्या ठिकाणी थांबून डहाणू समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकतात.

3- फ्लेमिंगो अभयारण्य तुम्हाला जर निसर्ग प्रेमासोबतच प्राणी मात्रांबद्दल जर प्रेम असेल व तुम्हाला प्राणी पाहायची आवड असेल तर तुमच्यासाठी ऐरोलीतील फ्लेमिंगो अभयारण्य एक उत्तम आणि बेस्ट ठिकाण आहे. मुंबईवरून तुम्ही कुठल्याही ठिकाणाहून ऐरोलीला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन मिळते. कुटुंबासोबत करण्यासाठी हे एक बेस्ट ठिकाण आहे.

4- कास पठार कास पठाराला फुलांची दरी देखील म्हटले जाते. अगदी दूरवर पसरलेल्या या खोऱ्यामध्ये ट्रेक करण्याचा एक आगळावेगळा आनंद मिळतो.कास पठाराचा भाग हा एक राखीव जंगलाचा भाग आहे व त्या ठिकाणी तुम्हाला 850 फुलांच्या प्रजाती पाहायला मिळतात.

विशेष म्हणजे 2012 मध्ये या कास पठाराला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील मान्यता मिळाली आहे. तुम्हाला जर कास पठारला भेट द्यायची असेल तर त्याआधी मात्र या ठिकाणी ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे असते.

5- माळशेज घाट माळशेज घाट हा निसर्गाने नटलेला असून त्या ठिकाणाच्या  धबधबे आणि हिरव्यागार जंगलांमुळे माळशेज घाट नेहमीच पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून पर्यटकांची गर्दी वीकेंडमध्ये या ठिकाणी होत असते.

माळशेज घाटात तुम्हाला गुलाबी फ्लेमिंगो पक्षांची दर्शन होते व निसर्गाच्या कुशीत राहण्याचा अनुभव देखील मिळतो. माळशेज घाटात गेल्यावर तुम्हाला हरिचंद्र किल्ला तसेच माळशेज धबधबा आणि आजोबा हिल फोर्ट इत्यादी ट्रेकिंग साठीच्या उत्तम ठिकाणांचा अनुभव घेता येईल व या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe