वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर, सुपा परिसरात रुग्णसंख्येत वाढ !

Ahmednagarlive24 office
Published:
helth

कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे असणारे रुग्ण घरोघरी दिसू लागते आहेत.

या वातावरणीय बदलामुळे सुपा येथे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने वातावरणीय बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून, त्यातून अनेकजण इन्फेक्शन ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अन् जुलाब यासारख्या आजारांनी त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे सरकारी रुग्णालयांसह बहुतांशी खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कधी ऊन, तर कधी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पावसातील गारवा व दिवसभरात बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावत आहे.

शिवाय सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर जाणवत आहेत. सततच्या या वातावरणीय बदलामुळे सर्दी, खोकला, ताप घशाचे आजार वाढत आहेत, दिवसभर ढगाळ वातावरण, मध्येच ऊन व काही वेळा पाउसही पडतो, या बदलाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो.

या बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्याने ऊलटी जुलाबासारखे आजार होत आहेत. या दिवसात पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. या वातावरणात लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, त्यांना सर्दी, डोकेदुखी, उलट्या जुलाब, असे आजार होतात.

परिसरात कचरा, घाण साचू देऊ नये. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असा सल्ला सुपा आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत असला तरही लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe