भारतात आणि जगात आहेत ‘हे’ सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म ! तुम्ही चालून थकाल,परंतु नाही संपणार प्लॅटफॉर्म

Published on -

भारतीय रेल्वे ही भारताची एक जीवन वाहिनी असून माल आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच भारतीय रेल्वे नेटवर्क हे सर्वात जुने नेटवर्क असून भारताच्या विकासामध्ये भारतीय रेल्वेचा मोलाचा सहभाग आहे. जर आपण भारतीय रेल्वेचा विचार केला तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे मार्ग असून त्यांचे वेगवेगळे अशी वैशिष्ट्ये देखील आहेत.

भारतीय रेल्वेचे नेटवर्क उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमे पासून तर पूर्व पर्यंत पसरलेले असून साधारणपणे भारताच्या कानाकोपऱ्यात भारतीय रेल्वे सध्या पोहोचल्याचे चित्र आहे. जर आपण भारतीय रेल्वेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये पाहिले तर यामध्ये अनेक मनोरंजक अशी वैशिष्ट्ये देखील आहेत व यामध्ये जर रेल्वे स्टेशनचे जगातील सर्वात लांब टॉप 10 प्लॅटफॉर्म पाहिले तर दहापैकी सात रेल्वे प्लॅटफॉर्म हे भारतात आहेत. जगामध्ये लांब रेल्वे प्लेटफॉर्मच्या यादीमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो.

हे आहेत भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म

1) हुबळी जंक्शन प्लॅटफॉर्म –
पश्चिम बंगाल राज्यातील हुबळी जंक्शन प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा सर्वात लांब प्लॅटफॉर्म असून त्याची लांबी 1507 मीटर आहे. हुबळी जंक्शनच्या या प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा जवळपास मार्च 2023 पासून जगातील सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म ओळखला जातो.

2) गोरखपुर रेल्वे स्टेशन –
हुबळी जंक्शन च्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नंतर उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर रेल्वे स्टेशनच्या प्लेटफॉर्मची लांबी १३६६ मीटर असून याचा देखील समावेश भारतातील लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये होतो. हुबळी जंक्शनच्या आधी गोरखपूर जंक्शनचा हा प्लॅटफॉर्म सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात होता. परंतु नंतर हुबळी येथे नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यात आल्यामुळे आता गोरखपूर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

3) कोल्लम रेल्वे स्टेशन –
हुबळी आणि गोरखपुर रेल्वे प्लेटफॉर्मनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकावर लांब असलेल्या रेल्वे प्लेटफॉर्म किंवा रेल्वे स्टेशनमध्ये केरळ राज्यातील कोल्लम रेल्वे स्टेशनचा नंबर लागतो. या रेल्वे स्टेशनची लांबी 1180.5 मीटर आहे.

4) खरगपूर रेल्वे स्टेशन –
पश्चिम बंगाल राज्यातील हुबळी जंक्शन ज्याप्रमाणे प्लेटफॉर्मच्या यादीत एक नंबर वर आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यातील खरगपूर रेल्वे स्टेशन हे या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जर आपण खरगपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मची लांबी पाहिली तर ती 1072.5 मीटर आहे.

5) अमेरिकेतील शिकागो स्ट्रीट सबवे –
जगातील टॉप लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर अमेरिकेतील शिकागो इथे स्ट्रीट सबवेचा नंबर लागतो. हा प्लॅटफॉर्म जगातील लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर असून या प्लॅटफॉर्मची लांबी 1067 मीटर आहे.

6) एग्मोर रेल्वे स्टेशन –
जगातील लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील एग्मोर रेल्वे स्टेशनचा नंबर लागतो व या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी 925.22 मीटर आहे.

7) पिलीभित जंक्शन –
जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म यादीमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीत जंक्शनचा सातवा नंबर लागतो. जर आपण पिलीभीत रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी पाहिली तर ती 900 मीटर आहे.

8) कॅलिफोर्निया येथे ऑटो क्लब स्पीडवे स्टेशन –
जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये कॅलिफोर्निया येथील आऊटो क्लब स्पीड वे स्टेशनचा जवळपास आठवा क्रमांक लागतो व या प्लॅटफॉर्मची लांबी 815 मीटर आहे.

9) बिलासपूर रेल्वे स्टेशन –
भारतातील लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये छत्तीसगड राज्यातील बिलासपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा जवळपास दहावा क्रमांक असून या बिलासपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी 802 मीटर आहे.

10) ब्रिटनच्या शर्टीन शटल टर्मिनल प्लॅटफॉर्म –
तसेच जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये ब्रिटनच्या शर्टीन शटल टर्मिनल या प्लॅटफॉर्मचा दहावा क्रमांक लागतो व त्याची लांबी 791 मीटर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe