न्याय मिळेपर्यंत नोकर भरती नको; शेवगाव सकल मराठा समाजाचे निवेदन

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने तातडीने पावले उचलून मराठा समाजाला न्याय मिळवून दयावा, अशा मागणीचे निवेदन शेवगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसिलदार मयूर बेरड यांना देण्यात आले असून मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती अथवा इतर नोकरभरती करू नये आदींसह अनेक मागण्या यात केल्या आहे.

निवेदनावर विजय शिंदे, राजेंद्र झरेकर, डाँ. निरज लांडे, निलेश बोरुडे, विष्णू घनवट, अकाश सुपारे आदींच्या सहया आहेत. निवेदनात म्हटले आहे की,आरक्षणास स्थगिती आल्याने विशेष इतर मागास प्रवर्गातील शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा समाजातील विदयार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने

आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बीगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 12 टक्के जागा मराठा विदयार्थ्यांसाठी वाढवाव्यात, स्थगितीबाबत निर्णय होईपर्यंत पोलिस भरती व इतर कोणतीही नोकर भरती करु नये. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेऊ नयेत.

11 ऑक्टोबरच्या व इतर काळातील या परीक्षा पुढे ढकलाव्यात,केंद्र शासनाने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा, मराठा समाजास हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळावे, 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने आरक्षणास स्थगिती देण्यापूर्वी शैक्षणिक प्रवेश व नोकर भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या

मराठा समाजाच्या उमेदवारांना लाभ देण्यात यावा. सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधी देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News