Ahmednagar News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना वैयक्तिक कोणा एका पक्षाची नाही राज्य सरकार जे काही उपक्रम राबवते, ते लोकांकडून मिळणाऱ्या टॅक्स रुपी पैशातूनच राबवले जातात.
या योजनेचा प्रत्येक महिला भगिनीला लाभ मिळावा, या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून आपण हे अभियान मतदारसंघात राबवले आहे.
तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील गोरगरीब लोक बेघर होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे या गोरगरिबांच्या संसाराकडे लक्ष वेधले.
परंतु या सरकारमधील प्रशासन या गोरगरीब लाडक्या बहिणींचे घरदार उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारने या लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. अशी टीका आमदार तनपुरे यांनी सरकावर केली.
तिसगाव येथे आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तिसगाव येथील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे अभियान राबवण्यात आले.
या अभियानाला तिसगाव येथील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शनिवारी सकाळीच या ठिकाणी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ते बोलत होते.
पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील महिला, भगिनींना गेली अनेक वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, मात्र आपण तिसगावसाठी १५५ कोटी रुपये खर्चाची एक्सप्रेस लाईन मंजूर करून या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात असून.
सध्या पाण्याची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तिसगावच्या महिलांची पाणीटंचाई कायमची दूर झालेली असेल.
तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून मंजूर केलेल्या एक्सप्रेस लाईनमध्ये देखील काही लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला परंतु आपण त्याचा वेळोवेळी पाठपुरा करत राहिलो आणि ही योजना अंतिम टप्प्यात आणली.
येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तिसगावच्या लाडक्या बहिणींना मुबलक पाणी या योजनेच्या माध्यमातून देणार असा विश्वास आमदार तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी परिसरातील नागरिकांसह कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या .