Ahmednagar News : गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञान आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात.

गुरुपौर्णिमेनिमित्त नेवासा तालुक्यातील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे येथे दिवसभरात हजारो भावीक भक्तांनी दर्शन घेतले. शिनाई मातेचे व श्री श्री १०८ महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांचे दर्शन व संतपुजन केले त्या प्रसंगी विविध कार्यक्रम पार पडले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान चे उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांचे संतपुजन केले.शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व माजी जि. प सदस्य सुनिल गडाख यांनी शुभेच्छा दिल्या.गुरुवर्य बाबाजींना शिनाई भक्त परिवारातर्फे चांदिचे ताट अर्पन केले.
यावेळी किशोर जोजार, बाळासाहेब भणगे, जनाभाऊ पटारे, आत्माराम अण्णा घोरपडे , बबन अप्पा भणगे , बाबासाहेब ढवाण, ज्ञानेश्वर पवार टेलर, बाळासाहेब पेहरे, भाऊसाहेब बनकर,कानिफनाथ गोडसे साहेब, विलास भाऊ मोहिटे, रमेश शेट साळुंके, किरणशेट मुनोत, गणेश भाऊ जाधव,अशोक भाऊ दरंदले, अविभाऊ ढवाण, नानासाहेब टेलर भणगे, सुनिल मिस्तरी गुजर, मदनभाऊ गुजर, समाधान प्लंबर गुजर , दत्तात्रय क्षिरसागर, भाऊसाहेब पंडीत,विलास भाऊ गादे , सुर्यभान लवांडे, नंदुभाऊ जाधव,बंडुभाऊ काळे, डॉ. रविंद्र काळे, संदिप तळपे, योगेश भाऊ पवार ,संदिप गुजर,संजुअण्णा जाधव, अक्षय भाऊ घोरपडे, मोहनतात्या भणगे,रामदास काळे, बाळासाहेब भणगे, कल्याणराव नवले, दिलीप भणगे, तात्यासाहेब कापसे, तुषार भाऊ पाठक, रावसाहेब भणगे , बाबासाहेब मोहिटे, भुषणभाऊ मोहिटे, अशोक धेडगे, पांडुरंग भणगे, अण्णासाहेब बनकर, बाळासाहेब भणगे पोपटराव शेकडे,गणेशभाऊ फुलसौंदर यांनी योगदान दिले.