भ्रष्ट पोलिसांचा अर्थसंकल्प सादर करणार ! पाच कोटींची ऑफर.. खा. राऊतांचा संवाद.. खा. लंकेंच्या उपोषणस्थळी घडतंय बरेच काही

शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी चर्चा केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता. पोलिस प्रशासनाविरोधात आंदोलन करू नये, यासाठी अनेकांनी संपर्क साधला, परंतु मी थांबणार नाही. आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला मी तेथे उपस्थित राहू शकलो नाही, तथापि, आज (ता. २४) भ्रष्ट पोलिसांचा अर्थसंकल्प जाहीर करू. दोन टक्के भ्रष्ट पोलिसांमुळे इतर पोलिसांची बदनामी होते.

Ahmednagarlive24 office
Published:
lanke

Ahmednagar News : पोलिस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी मंगळवारीही सुरूच होते. सायंकाळी लंके यांचा रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढली.

दरम्यान, शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी चर्चा केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता. पोलिस प्रशासनाविरोधात आंदोलन करू नये, यासाठी अनेकांनी संपर्क साधला, परंतु मी थांबणार नाही.

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला मी तेथे उपस्थित राहू शकलो नाही, तथापि, आज (ता. २४) भ्रष्ट पोलिसांचा अर्थसंकल्प जाहीर करू. दोन टक्के भ्रष्ट पोलिसांमुळे इतर पोलिसांची बदनामी होते.

भ्रष्ट पोलिसांचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उद्या आंदोलक कोट घालून, सुटकेसमध्ये येतील, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. दोन दिवसांपासून हे उपोषण सुरु असून आज तिसरा दिवस आहे.

पाच कोटींची ऑफर दिल्याचा आरोप
दरम्यान, उपोषण करू नये, यासाठी अनेकांचे फोन आले. पाच कोटी रुपये देतो, तसेच महिन्याला पॅकेज ठरवून देतो, अशी ऑफर देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप खासदार लंके यांनी केला.

पोलिस दलातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे आंदोलन हाती घेतले असून, कारवाई झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी साधला संवाद
उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फोनवरून खासदार नीलेश लंके यांच्याशी सांयकाळी संवाद साधला. त्यांनी उपोषणस्थळी भेट देणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ठोस निर्णयाशिवाय माघार नाही
चुकीच्या पध्दतीने काम करणारे अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, ही प्रमुख मागणी आहे. आंदोलनास किती दिवस लागतील, हे माहिती नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेत नाही, असे लंके यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe