Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या आषाढी सरींनी पुन्हा विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
त्यामुळे अहमदनगरकरांना दिलासा मिळत आहे. त्यामुळे आता अहमदनगरजिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या मुळा धरणाचा साठा १० हजार २६४ दलघफू (३९ टक्के) झाला आहे. धरणाकडे ९ हजार १५५ क्यूसेकने नविन पाणी साठा जमा होत आहे.
अकोलेतील घाटघर, रतनवाडीत आषाढ सरींचे तांडव सुरू झाल्याने काल दिवसभरात तब्बल ३२८ दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी ६५११ दलघफू झाला होता.
पाऊस सुरूच असल्याने मंगळवारी रात्री ९ वाजता हा पाणीसाठा ६६०५ दलघफू (६० टक्के) झाला होता. आज रात्रीपर्यंत हे धरण ६२ टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा २४ टक्क्यांवर पोहचला होता.
दरम्यान मुळा धरणाचा विचार करता, नगर दक्षिणेची जलदायिनी असलेल्या मुळा धरणाचा खपाटलेला पाणी साठा आषाढी सरींनी वाढत आहे. २६ हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळाने १० हजाराचा पल्ला गाठलेला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही १६ हजार दलघफू पाण्याची नविन पाण्याची गरज आहे.
आढळा निम्मे भरले
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यांतील २० गावांतील लाभक्षेत्राचे सिंचन करणाऱ्या देवठाण येथील आढळा धरण निम्मे भरले आहे. १०६० दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सकाळी ५३१ दलघफू (५० टक्के) झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे