भारतीय संरक्षण विभागाने विकसित केलेली बेड आयसोलेशन सिस्टमप्रथमच नगर जिल्ह्यात कार्यान्वित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना विषाणूला प्रतिबंधित अथवा नष्ट करणारी रामबाण लस निर्माण होऊन ती भारतात जनसामान्यांपर्यंत यायला पुढील किमान ५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

अशावेळी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने (डी.आर.डी.ओ.द्वारे) विकसित केलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेली बेड आयसोलेशन सिस्टम (BIS) कोविड विरुद्धच्या संघर्षाला पूर्णतः कलाटणी देईल , असे प्रतिपादन ‘स्वयंपूर्ण फौंडेशनचे’ अध्यक्ष नाथाभाऊ पंडित यांनी केले.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल मधील स्नेहदीप कोवीड सेंटर’ मध्ये स्वयंपूर्ण फाउंडेशन तर्फे २ खाटा आज देणगीदाखल देण्यात आल्या. यावेळी स्वयंपूर्ण फौंडेशनचे संस्थापक खुर्शीद पठाण, संचालक अय्याज पठाण, स्नेहालय आरोग्य सेवेचे मानद संचालक डॉ. सुहास घुले, मार्गदर्शिका डॉ. मार्सिया वाँरन, डॉ. निलेश परजणे,

संस्थेचे संजय गुगळे- राजीव गुजर, अनिल गावडे, स्नेहदीप कोविड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिष केदारी, डॉ. शुभम गडाख,विष्णू कांबळे आदी उपस्थित होते. भारतीय संरक्षण विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित ‘बेड आयसोलेशन सिस्टीम’ चे उत्पादन ‘डॉक्ट्रा प्लस’या कंपनीद्वारे जबलपुर मध्य प्रदेश येथे केले जात आहे.

सध्याच्या स्थितीत परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार उपचार आणि सेवा कोविड रुग्णांना देणाऱ्या स्नेहालयच्या स्नेहदीप कोबीड सेंटरमध्ये या यंत्रणेला कार्यान्वित करून त्याचे लोकार्पण कंपनी आणि स्वयंपूर्ण फाउंडेशन द्वारा करण्यात येत असल्याचे ‘डॉक्ट्रा प्लस’ कंपनीचे विपणन अधिकारी नितीन फुलपगर यांनी सांगितले.

स्नेहालयाचे खजिनदार जयकुमार मुनोत म्हणाले की, “छोट्याश्या पत्र्याच्या शेडमध्ये एड्सग्रस्तांसाठी ३ दशकांपूर्वी स्नेहालयचे रुग्णालय सुरू झाले. आज येथून कविड रुग्णांना मिळत असलेली सेवा, स्नेहालय परिवाराचे श्रमसाफल्य आहे.” अहमदनगर मधील विविध रोटरी क्लब, स्नेहालय,

अहमदनगर महानगरपालिका आणि क्रॉम्प्टन कंपनीचे सहयोगातून पॉलिटेक्निक महाविद्यालयात कोबीड रुग्णांसाठी मागील २महिन्यांपासून मोफत रुग्णसेवा दिली जाते. त्यामुळे आजवर १५०० रुग्णांना जीवदान मिळाल्याचे संस्थेचे मुख्य पालक मिलिंद एकनाथ कुलकर्णी यांनी नमूद केले. सूत्रसंचालन प्रविण मुत्याल यांनी तर आभार अनिल गावडे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe