एकीकडे खा. लंकेंचे उपोषण, दुसरीकडे एलसीबीचा पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात, मोठी घडामोड..

फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या पोलिस नाईक विरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on -

Ahmednagar News :  फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या पोलिस नाईक विरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक संदीप चव्हाण (तत्कालीन नेमणूक स्थानिक – गुन्हे शाखा, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात

असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व ताब्यात घेतल्याने सोडून देण्यासाठी चव्हाण याने तक्रारदार यांच्याकडे २२ मार्च रोजी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत नाशिक येथे तक्रार केली होती.

फिर्यादीचे सावळीविहीर-शिर्डी रस्त्यावरील हॉटेलवर २१ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजता गोळीबार झाला. काही वेळाने तिथे पोलिस आले आणि त्यांनी वाद मिटविला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस आले अन् भावाला घेऊन गेले.

रात्री उशिरा पोलिस नाईक संदीप चव्हाण यांचा फोन आला. तुझ्या भावाला आरोपी करायचे नसले तर दोन लाख रुपये घेऊन ये, असे ते म्हणाले. त्यानंतर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासह पडताळणी सापळा लावला.

पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रवेशद्वारात गेल्यानंतर पोलिस संदीप चव्हाण यांना फोन केला. ते मोटारीजवळ आले. त्यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दीड लाख रुपये घेण्याचे कबूल केले.

पैसे देण्यासाठी संध्याकाळी येतो म्हणाल्यानंतर ते निघून जा म्हणाले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी ते आले नाही. मात्र, त्यांनी लाचेची मागणी केली होती. तसा जबाब ३० जून २०२४ रोजी नोंदविण्यात आला होता. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe