Health Tips: ‘ही’ लक्षणे दिसायला लागताच पटकन व्हा सावध! असू शकतो डायबिटीस, वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- सध्या मोठ्या प्रमाणावर धावपळीची जीवनशैली आणि प्रचंड ताणतणाव इत्यादीमुळे अनेक प्रकारच्या आजारांचा विळखा कित्येक जणांना पडताना आपल्याला दिसून येतो. तसेच आता धावपळीच्या जीवनशैलीमुळे संतुलित आहार न घेणे तसेच व्यायामाचा अभाव आणि मोठ्या प्रमाणावर जीवनशैलीत झालेला बदल अनेक आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.

त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून हार्ट अटॅक, डायबिटीस व रक्तदाबा सारख्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. यामध्ये जर आपण डायबिटीस अर्थात मधुमेह या आजाराचा विचार केला तर या आजारामुळे कित्येक लोक त्रस्त असून दिवसेंदिवस या  आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येत आहे.

आजाराच्या बाबतीत पाहिले तर कुठलाही आजार अगोदर आपल्याला काही लक्षणे दाखवतो व त्याच पद्धतीने मधुमेहाचे देखील काही लक्षणे आपल्याला दिसून येतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर मधुमेह आजाराची सुरुवात होताना लघवीचे प्रमाणात वाढ होते. यासारखे अनेक लक्षणे आपल्याला दिसतात.

 हे लक्षणे दिसल्यास असू शकतो डायबिटीस

1- तोंड कोरडे पडणे जर आपण या क्षेत्रातील तज्ञांची माहिती पाहिली तर त्यानुसार जर तोंड कोरडे पडत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे रक्तामध्ये जर साखरेचे प्रमाण जास्त झाले तर किडनी कडून पाण्याचा वापर जास्त व्हायला लागतो व त्यामुळे वारंवार लघवी होते.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होते व तोंड कोरडे पडते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास तोंड कोरडे पडणे आणि जास्त लघवीची लक्षणे दिसायला लागतात.

2- हिरड्या दातांमध्ये समस्या निर्माण होणे रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते तेव्हा तोंडात बॅक्टेरिया पसरायला सुरुवात होते व परिणामी हिरड्यांचे आजार देखील होतात.

बऱ्याचदा ब्रश करताना रक्तस्राव देखील व्हायला लागतो व हिरड्यांचे विकार होतात तेव्हा दात खराब व्हायला लागतात. दातांची झीज होऊन त्यामध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्यता उद्भवते व दात खिळखिळे होऊन गळण्याचे प्रमाण देखील वाढते.

3- लाळेमध्ये साखरेचे प्रमाण वाढणे डायबिटीस या आजाराच्या अगदी सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे लक्षण मानले जाते. याबाबतीत तज्ञ म्हणतात की, रक्तामध्ये जेव्हा साखरेची पातळी वाढते तेव्हा बॅक्टेरिया वाढायला लागतात व त्याचा परिणाम म्हणून  दातांमध्ये पोकळी आणि तोंडामध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

4- श्वासाला येतो कुजक्या फळासारखा  वास जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमच्या श्वासाला कुजलेल्या फळासारखा वास यायला लागतो व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे हे घडते. त्यामुळे मधुमेहाचे निदान होण्यासाठी देखील हे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

5- तोंडामध्ये जखमा होऊ शकतात याबाबत तज्ञ म्हणतात की, मधुमेहाचा प्रादुर्भाव झालेल्या पेशंटच्या तोंडांमध्ये जखमा व्हायला लागतात व हे एक सामान्य लक्षण असते. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते तेव्हा या जखमा होतात.

 याशिवाय….

सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे तसेच थकवा येणे, वजन कमी होणे यासारखे लक्षणे देखील रुग्णांमध्ये दिसून येतात. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे तुम्हाला दिसून आल्यास पटकन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe