या तालुक्यात कोरोना झाला पुन्हा सक्रिय

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण कमी झाले होते, मात्र गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढले आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी काहीश्या प्रमाणांत वाढली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या ४८ तासात १५३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

तसेच गेल्या ४८ तासात ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यानं घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३७३९ इतकी आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:४३८५८

उपचार सुरू असलेले रूग्ण:३७३९

मृत्यू:७५०

एकूण रूग्ण संख्या:४८३४७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe