Recruitment 2024: पदवीधर असाल तर एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये आहे नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल 35 हजार पगार

Published on -

Recruitment 2024:- सध्या विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवल्या जात असून काही विभागाच्या माध्यमातून भरतीच्या नोटिफिकेशन देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विविध भरती परीक्षांच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक सुवर्णसंधीचा कालावधी आहे.

या पद्धतीने जर आपण पदवीधर उमेदवारांसाठी बघितले तर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या माध्यमातून एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहे व याकरिता जाहिरात देखील काढण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर पदवीधर असाल तर या संधीचे सोने करण्याची गरज आहे.

 पदवीधरांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या माध्यमातून एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत व त्या अंतर्गत भरती करिता जाहिरात काढण्यात आलेली आहे.

या भरतीतून कनिष्ठ सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत व पात्र असलेल्या उमेदवारांकडून आता अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मधील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या दोनशे रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून याकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे.

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत राबविण्यात येणार्‍या या कनिष्ठ सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवाराचे वय हे एक जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्ष या दरम्यान असावे.

 किती आहे परीक्षा फी?

या भरतीसाठी जे पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करतील त्यांना परीक्षा फी म्हणून 800+ 18% जीएसटी इतकी परीक्षा फी भरावी लागेल.

 निवड झाल्यावर किती मिळेल वेतन?

या भरतीमध्ये कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना 32000 ते 35 हजार 200 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

 या भरतीमध्ये कशी होणार निवड?

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या निवडीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे व मुलाखतीचा टप्पा पार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण

या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांचे नियुक्ती संपूर्ण भारतात कोणत्याही ठिकाणी केली जाईल.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक पदाच्या एकूण दोनशे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत व त्यासाठीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट

https://www.lichousing.com/ या अधिकृत वेबसाईटवर संपर्क करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe