Raksha Bandhan Special: रक्षाबंधना निमित्त बहिणीला द्या खास गिफ्ट! ‘या’ ठिकाणी बनवा बहिणीसोबत फिरण्याचा प्लॅन, बहिण होईल खुश

Ajay Patil
Published:
jaisalmer fort

Raksha Bandhan Special:- रक्षाबंधन हा सण म्हटले म्हणजे बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणून ओळखला जातो व रक्षाबंधनाचे महत्त्व बहिण आणि भावाच्या नात्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. यावर्षी रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्टला येत असून श्रावण महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला हा सण येतो.

या दिवशी बहिण भावाला राखी बांधते व भावाच्या प्रगती आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ईश्वराकडे मनोभावे प्रार्थना करते व त्या बदल्यात भाऊ आयुष्यभर बहिणीचे रक्षण करेल असे तिला वचन देतो. या दिवशी बहीण आपल्या भावाकडे हक्काने काहीतरी भेट मागते व ती भाऊ देतोच. असा हा महत्वपूर्ण दिवस आहे.

त्यामुळे या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला देखील तुमच्या बहिणीला काहीतरी हटके अशी भेट द्यायची असेल तर तुम्ही या वेळच्या रक्षाबंधनाच्या वेळेस बहिणीला कुठेतरी बाहेर फिरायला नेऊ शकतात व बहिणीला हटके गिफ्ट देऊ शकता.

त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या बहिणीला रक्षाबंधन निमित्त कुठे फिरायला न्यायचे असेल तर आपण या लेखात अशी काही ठिकाणी बघणार आहोत जी फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहेतच आणि त्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य देखील मनाला मोहून टाकणारे आहे.

 राजस्थान मधील ही ठिकाणे आहेत फिरण्यासाठी महत्त्वाचे

1- जैसलमेर राजस्थानमध्ये जैसलमेर हे ठिकाण खूप महत्त्वाचे असून याला सोनेरी शहर म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी असलेल्या सोनेरी वाळूवर फिरणे हा एक वेगळाच आनंद देणारे असते. तुम्हाला जैसलमेरमध्ये राहून त्या ठिकाणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी असलेल्या रिसॉर्टमध्ये एक रात्रभर थांबण्याचा प्लॅन करू शकतात व या ठिकाणचे सौंदर्य अनुभवू शकतात.

जैसलमेर येथे असते या पिवळा किल्ला हा सोन्यासारखा दिसतो व तो भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.इतकेच काय तर वाळूच्या ढिगार्‍यावर तंबू उभारून तुम्ही एक रात्रभर देखील या ठिकाणी राहू शकतात. रात्रभर तंबूत राहण्याचा अनुभव हा जीवनात अविस्मरणीय असा ठरेल.

तसेच जैसलमेर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर वाळवंटी भागामध्ये अतिशय लक्झरी आणि मध्यम श्रेणी कॅम्पिंग सुविधा देखील उपलब्ध आहेत. तसेच जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा तुम्ही या ठिकाणी असलेल्या गडीसर तलावाला भेट देऊ शकतात व तुमच्या आनंदात भर पाडू शकतात.

2- बिदासर राजस्थान राज्यांमध्ये असलेल्या चुरू जिल्ह्यात हे ठिकाण आहे व या ठिकाणी चित्रपटांची देखील अनेक शूटिंग आजपर्यंत करण्यात आलेले आहेत. राजस्थान राज्याची लोकसंस्कृती तुम्हाला जवळून अनुभवायचे असेल तर तुम्ही बिदासरला भेट देणे गरजेचे आहे.

तुम्ही जर बिदासरला गेला तर त्या ठिकाणी असलेल्या झोपड्या तसेच मातीची घरे व अशा अनेक  आकर्षक गोष्टी पाहायला मिळतात की तुम्ही ते कधी विसरू शकत नाही. या ठिकाणच्या गावांचे दृश्य पाहणे हा एक अप्रतिम अनुभव असतो व याकरिता तुम्ही तुमच्या बहिणी सोबत या ठिकाणी जाऊन रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीचा आनंद द्विगुणित करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe