अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन एका तरुणीने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.
पूजा रमेश औताडे (वय २६,वर्ष) असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोपरगाव येथे संजीवनी सहकारी कारखान्याच्या संजिवनी कॉलेजसमोर डी टाईप या बिल्डिंग मध्ये ती रहिवाशी होती. तसेच येवला येथे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात ती शिकत होती.
पूजा औताडे ही ५ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजेपासून गायब होती. बेपत्ता असल्याची खबर मुलीच्या आईने कोपरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर तिचा शोध सर्वत्र घेण्यात आला होता.
मात्र ती मिळून आली नव्हती. संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुंबई नागपूर या राज्यमार्गावरील गोदावरी नदी खडकाच्या ठिकाणी पुलाखाली प्रेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी ते प्रेत नदीबाहेर काढले. ते प्रेत पूजा औताडे असल्याचे नातेवाईक यांनी पोलिसांना माहिती दिली. मुलीने कशामुळे आत्महत्या केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved