अहमदनगरमधील ‘या’ पोलीस ठाण्यासमोर सिनेस्टाईल हाणामारी, मार खाणारे तहसील कार्यालयात पळाले..नंतर..

नगर शहरासह जिल्ह्यातील मारहाण किंवा इतर गुन्हेगारी घटना पाहता नागरिकांत एकप्रकारे चिंतेचे वातावरण आहे. शहरात हाणामारीच्या विविध घटना कायम घडताना दिसतात.

Ahmednagarlive24 office
Published:
hanamari

Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यातील मारहाण किंवा इतर गुन्हेगारी घटना पाहता नागरिकांत एकप्रकारे चिंतेचे वातावरण आहे. शहरात हाणामारीच्या विविध घटना कायम घडताना दिसतात.

आता थेट पोलीस ठाण्यासमोरच हाणामारीची घटना घडली आहे. शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यासमोरच दुचाकीवर सिनेस्टाईलने येऊन दहशत करत तिघाजणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या घटनेने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

तोफखाना पोलीस ठाणे तालुका दंडाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२६) रोजी हातात दांडे घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविल्याची घटना घडली. तसेच दुसरी घटना चाँदबीबी महालाच्या डोंगरावर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या चुलत्या-पुतण्याला ५ टोळक्याने ‘आम्ही नगरचे बाप आहोत’,

असे म्हणून लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे या लोकांना पोलिसांची भीती वाटत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शुक्रवारी (दि. २६) रोजी सायंकाळी तोफखाना पोलीसा ठाणे परिसरात तसेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या राड्याने तर नागरिक हैराण झाले आहेत.

प्रोफेसर चौक ते तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीवर हातात लाकडी दांडे घेऊन दहशत करत दुचाकीस्वाराला मारण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तो तहसील कार्यालयाच्या आवारात पळाला असता तो वाचला. तेथे असलेले पोलीस कर्मचारी यांनी वेळीच मदत केल्याने हा अनर्थ टळला.

तहसील कार्यालयासमोर चहा पिण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकीचे नुकसान झाले. पोलिसांनी वेळीच मदत केल्याने दुचाकीवर आलेले

युवकांनी तेथून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अशा लोकांचा, घटनांचा पोलिसांनी वेळेत बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe