Best Sunroof Car: मस्त सनरूफ कार खरेदी करा आणि लॉंग ड्राईव्हचा आनंद घ्या! ‘या’ आहेत भारतातील स्वस्तातल्या बेस्ट सनरूफ कार

Ajay Patil
Published:
sunroof car

Best Sunroof Car:- जेव्हा कोणताही व्यक्ती कार घेण्याचा विचार करतो त्या आधी सर्वात अगोदर विचार करतो तो म्हणजे बजेटमध्ये मिळेल अशी परवडणारी कार आणि मिळणारे वैशिष्ट्य या गोष्टींचा होय. सध्या जर आपण भारतीय कार बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक दिग्गज कंपन्यांनी वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या कार्स बाजारपेठेत लॉन्च केलेले आहेत

व यामध्ये आपल्याला परवडेल या किमतीत मिळणारी उत्तम अशी वैशिष्ट्य असलेली कार घेण्याकडे आपल्याला प्रत्येकाचा कल दिसून येतो. तसेच काही लोकांना मोकळ्या वाहनातून प्रवास करायची खूप आवड असते व त्याकरिता असे व्यक्ती सनरूफ फिचर असलेल्या कारच्या शोधात असतात व परवडणाऱ्या किमतीमध्ये कोणती कार आपल्याला मिळेल याबाबतीत सर्च करत असतात.

त्यामुळे तुम्हाला देखील जर सनरूफ कार घ्यायची असेल तर बारा लाख रुपयापेक्षा कमी किमतीचे अनेक पर्याय सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामध्ये मारुती सुझुकी आणि महिंद्रा सारख्या महत्त्वाच्या कंपन्यांचे मॉडेल्स देखील बाजारपेठेत आलेले आहेत.

 या आहेत परवडणाऱ्या किमतीत मिळणाऱ्या बेस्ट सनरूफ कार

1- महिंद्रा XUV 3XO- आपल्याला माहित आहे की,महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या माध्यमातून महिंद्रा XUV 3XO ही कार अलीकडच्या कालावधीमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे व ही तीन इंजिन पर्यायमध्ये आलेली आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो इंजिन देण्यात आले असून जे 82 KW ची पावर आणि 200 एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच त्याचे 1.2 लिटर TdGi पेट्रोल 96 kW पावर आणि 230 एनएम टॉर्क जनरेट करते आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल 86 kW पावर आणि तीनशे एनएम टॉर्क जनरेट करते.

महिंद्राच्या या कारमध्ये 940mm×870mm स्कायरूफ देण्यात आलेले आहे व या कारमध्ये हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम देखील देण्यात आलेली असून या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 49 हजार रुपये पासून सुरू होते.

2- मारुती सुझुकी ब्रेझ्झा मारुती सुझुकी कंपनीच्या ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ फिचर देण्यात आले असून यासोबतच या कारमध्ये हेड अप डिस्प्ले देखील आहे व या कारमध्ये 360 डिग्री व्ह्यू कॅमेऱ्याची सुविधा आहे.

या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार तुम्ही तुमच्या फोनला देखील कनेक्ट करू शकता व ही एक स्मार्ट हायब्रीड कार आहे. जर आपण या घरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये K15C 1462cc इंजिन असून जे पेट्रोल मोडमध्ये 6000 rpm वर 100.6 पीएचचा पावर देते.

तसेच 4400 आरपीएमवर 136.0 टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी ब्रेझ्झाची एक्स शोरूम किंमत 8 लाख 34 हजार रुपयांपासून सुरू होते.

3- टाटा पंच टाटा पंच ही टाटा मोटर्सची प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार असून या कारचे जवळपास 25 प्रकार बाजारामध्ये आहेत. टाटाच्या कारमध्ये व्हाईस असिस्टेड सनरूफची सुविधा देण्यात आली असून या कारमध्ये सात इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सात इंचाचे TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेला

असून या कारमध्ये सर्वोत्तम अनुभव मिळावा याकरिता चार स्पीकर आणि दोन ट्विटर देखील बसवण्यात आलेले आहेत. या कारचे एक्स शोरूम किंमत सहा लाख 12 हजार 900 रुपयापासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe