राहुरीतील शासकीय कार्यालये शहराचे बाहेर नेण्याचा तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाचा निषेध : आ. तनपुरे

Ahmednagarlive24 office
Published:
tanpure

शहरात असलेली शासकीय कार्यालये शहराचे बाहेर नेण्याचा तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाचा आपण निषेध करतो. वास्तविक हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी महणून मला व व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता केलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

शहरातील सर्व शासकीय कार्यालये व ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्याचा विषय आपण अनेकदा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तसे पाहिले तर निर्णय म्हणजे विधानसभेच्या सदस्यांचा हक्कभंग होऊ शकतो आहे.

राहुरी येथील नियोजित प्रशासकीय इमारत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने सद्या आहे. त्या जागेतच प्रशासकीय इमारत उभी करावी, या मागणीसाठी राहुरीतील व्यापारी असोसिएशन व व्यापारी संघटना यांनी तहसील कायर्यालयात जाऊन नुकतेच निवेदन दिले.

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शनि मंदिरापासून तहसील कार्यालयात पायी जात निवेदन सादर केले. यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की, राहुरीतच प्रशासकीय इमारत होणे हे सर्वांचेच हिताचे आहे. येवून चार किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी अनेक समस्या उद्भवणार आहेत.

राहुरी तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक शहरात विविध कामाचे निमित्ताने येतात. यात महसूल, पोलीस प्रशासन, खरेदी विक्री कार्यालय यासह अन्य कामे असतात. प्रशासकीय इमारत दुसऱ्या ठिकाणी झाली. तर ते त्रासदायक ठरणारे आहे यात कोणतेही राजकारण न करता सर्व पक्ष या मागणीसाठी एकत्रच आहे. शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख म्हणाले की, सद्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. याच ठिकाणी प्रशासकीय इमारत होणे अत्यंत गरजेचे आहे. निर्णय बदलला नाही तर नागरिक एकत्र येऊन आआंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, केमिस्ट संघटनेचे सूर्यकांत भुजाडी यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सुभाष सावज, नंदकुमार भट्टड, प्रमोद मुथा, नंदकुमार तनपुरे प्रवीण दरक, अनिल भट्टड, संतोष आळंदकर, मनोज पारख, शितल बाफना, अभय धावडे, तुळशीराम कडू, प्रशांत कोळपकर, विलास तरवडे, सूर्यकांत भुजाडी, सुनील निमसे, संदीप राऊत, संजय धोंडे, गणेश भिगारकर, अशोक आहेर, गजानन सातभाई, प्रशांत तनपुरे, श्रीकृष्ण मोरे, दीपक रकटे, सुरेश कोकाटे, शहाजी ठाकूर, विजय करपे, इस्माईल सय्यद, बाळासाहेब खुळे, बाळासाहेब उंडे, संदीप सोनवणे, महेश उदावंत, विलास वराळे, गौरव तनपुरे, अवधूत कुलकर्णी, वैभव वराळे, किशोर पातोरे, ज्ञानेश्वर जगधने, विजय करपे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe