Share Market News: कराल ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक तर वर्षभरात कराल छप्परफाड कमाई! वाचा प्रसिद्ध शेअर्स एक्सपर्टने दिलेला सल्ला

Ajay Patil
Published:
share market

Share Market News:- आज शेअर बाजारामध्ये बऱ्यापैकी तेजी दिसून येत असून आज देखील शेअर बाजारात तेजीची स्थिती आहे. आज सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह 81 हजार 600 च्या पातळीवर व्यवहार करत असून निफ्टी देखील 50 पेक्षा जास्त अंकांनी वर आहे व  24 हजार 90 च्या आसपास व्यवहार करत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण सेन्सेक्समधील 30 समभाग पाहिले तर त्यापैकी 20 शेअर्समध्ये वाढ झाल्याचे दिसून आले व दहा शेअर्समध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामध्ये एनर्जी तसेच मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये अधिक तेजी दिसून येत असून बँकिंग शेअर्समध्ये आज थोडी घसरन दिसून येत आहे.या सगळ्या शेअर मार्केटच्या पार्श्वभूमीवर मजबूत फंडामेंटल असलेले अनेक शेअर्स दीर्घ मुदती करिता गुंतवणुकीसाठी आकर्षक दिसून येत आहेत.

याबाबत प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस शेअर खानने पाच दर्जेदार शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला असून पुढील एक वर्षात 23 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा देण्याची क्षमता या शेअर्समध्ये आहे.

 प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस शेरखानने दिले हे पाच दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

1- रामको सिमेंट शेअरखान यांनी रामको सिमेंटवर खरेदीचा सल्ला दिला असून याकरिता प्रति शेअर टारगेट प्राइस एक हजार दहा रुपये ठेवण्यात आले असून 29 जुलै 2024 रोजी हा शेअर ८१८ रुपयांवर होता. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना 23% पर्यंत परतावा मिळू शकतो.

2- हिमान्तसीका सेदे(Himatsingka Seide)- शेरखानने Himatsingka Seide वर प्रतिशेअर टारगेट 166 रुपये ठेवण्यात आले आहे. जर आपण या शेअरची 29 जुलै 2024 रोजी किंमत पाहिली तर ती 140 रुपये होती. अशाप्रकारे टारगेट प्राईज नुसार सध्याच्या किमतीपेक्षा 18% पर्यंत परतावा गुंतवणूकदारांना मिळू शकतो.

3- व्ही गार्ड इंडस्ट्रीज या शेअरसाठी शेअरखान यांनी प्रतिशेअर टारगेट 528 रुपये ठेवले असून 29 जुलै 2024 रोजी या शेअरची प्राईस 460 रुपये होती. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना 15% पर्यंत परतावा या माध्यमातून मिळू शकतो.

4- अशोक लेलँड या शेअरवर खरेदीचा देखील सल्ला शेरखानने दिला असून प्रतिशेअर टारगेट 285 रुपये ठेवण्यात आले आहे. 29 जुलै 2024 रोजी हा शेअर्स 256 रुपयांवर होता व अशा प्रकारे सध्याच्या गुंतवणुकीवर 11% पर्यंत परतावा मिळू शकतो.

5- मॅरीको यावर देखील खरेदीचा सल्ला देण्यात आला असून यासाठी प्रति शेअर्स टार्गेट 755 ठेवण्यात आले आहे व 29 जुलै 2024 रोजी या शेअरची प्राईस 683 रुपये होती. अशाप्रकारे यात गुंतवणूक केली तर सध्याच्या किमतीपेक्षा दहा टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe