Gold Price: आता भारतामध्ये स्वस्तात खरेदी करता येईल सोने! प्रतितोळा 5 ते 6 हजार रुपयांनी स्वस्त होणार सोन्याचे दर? काय आहे या मागील कारण?

Published on -

Gold Price:- गेल्या कित्येक दिवसापासून आपण सोने आणि चांदीचे दर पाहिले तर ते उच्चांकी पातळीवर होते व गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपण पाहिले. ही सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्यापलीकडे गेलेली होती.

परंतु आता नुकताच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला व यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या व त्यातील एक महत्त्वाची घोषणा अशी होती की सोन्यावरील आयात शुल्क जे असते त्यामध्ये कपात करण्याचे त्यांनी जाहीर केले व त्यांच्या या निर्णयानंतर लागलीच त्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळालेली होती.

आयात शुल्क कमी केल्यामुळे स्वस्तात भारतामध्ये सोने आता पोहोचायला सुरुवात झाली असून  साधारणपणे काल म्हणजेच एक ऑगस्टपासून कमी आयात शुल्कासह सोन्याची विक्री सुरू होईल अशी अपेक्षा असून जर असं झाले

तर नागरिकांना स्वस्तात सोने खरेदी करता येण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सोन्यावर आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्कात थेट 9 टक्क्यांनी घट करण्यात आलेली आहे.

 भारतात मिळेल स्वस्तात सोने?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्यावर आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्कामध्ये कपात करण्याचे जाहीर केले व त्यानंतर देशांमध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली व या घोषणेनंतर आयात शुल्क कपात करून स्वस्तामध्ये सोने आता भारतात पोहोचले असून लवकर त्याची विक्री सुरू होईल अशी एकापेक्षा असून नागरिकांना स्वस्त सोने खरेदी करता येणार आहे.

अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील आयात शुल्क पंधरा टक्क्यांवरून 6% करण्यात आले व हे आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचा परिणाम लगेच आपल्याला त्यादिवशी दुपारपासून दिसून आला होता.सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. परंतु असे असले तरी स्वस्तातले सोने देशाबाहेरून आयात करायला थोडा वेळ लागतो व त्याची एक प्रोसेस असते.

त्यामध्ये कस्टमची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते देशात पोहोचते. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या टप्प्यावर असून साधारणपणे कालपासून देशात आयात शुल्क कमी केलेले सोने येईल व किरकोळ बाजारपेठेत त्याची विक्री सुरू होईल अशी शक्यता आहे.

 सोने किती स्वस्त होऊ शकते?

ऑल बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या मते सीमा शुल्काच्या संदर्भातील औपचारिकता पूर्ण करण्याकरिता एक आठवडा जवळपास लागला व आता एक ऑगस्टपासून हे कमी आयात शुल्कासह सोने देशामध्ये पोहोचेल व त्याचा परिणाम सोन्याचे किरकोळ किमतींवर दिसून येईल.

जर आयात शुल्कामध्ये नऊ टक्के कपात झाली असेल तर ग्राहकांना अंदाजे त्याच किमतीमध्ये आता सोने मिळेल. साधारणपणे प्रतितोळा पाच ते सहा हजार रुपयांनी सोने स्वस्त होऊ शकते. एवढेच नाहीतर या ज्वेलर्स असोसिएशनच्या मतानुसार बघितले तर आयात शुल्कामध्ये कपात केल्यामुळे सोन्याच्या काळ्या बाजारावर देखील या माध्यमातून नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे.

बरेच ज्वेलर्स आता ग्राहकांकडून सोन्यावर प्रीमियम करू शकणार नाहीत. काही ज्वेलर्स ब्लॅकमध्ये सोने आयात करत होते व त्यावर 15 टक्के प्रीमियम आयात शुल्क आकारत होते व आता या शुल्कात कपात केल्यावर ज्वेलर्स अशाप्रकारे कृत्य करू शकणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe