घरात घुसून कुऱ्हाडीने वार करून महिलेचा खून, अहमदनगरमधील घटना

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव शिवारातील एका महिलेचा घरात शिरून कुऱ्हाडीने खून केल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी (दि.२) रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुन्ना शेखनूर पठाण यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की शम्मा शेखनूर पठाण (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

Published on -

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव शिवारातील एका महिलेचा घरात शिरून कुऱ्हाडीने खून केल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी (दि.२) रात्री १ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मुन्ना शेखनूर पठाण यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की शम्मा शेखनूर पठाण (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

त्या निपाणीवाडगाव येथे आपले भाऊ युनूस पठाण, साहिल सादीक सय्यद, मेहक सादीक सय्यद यांच्या समवेत राहातात. निपाणीवाडगाव शिवारात राहाणारे आकाश बर्डे आणि एक अल्पवयीन मुलगा असे दोघेजण त्यांच्या घरी आले. त्यावेळी आकाशच्या हातात कुऱ्हाड होती.

तो साहील सय्यद याच्या डोक्यात कुऱ्हाड मारायला लागला, तेव्हा शम्मा शेखनुर पठाणला वाचविण्यासाठी मध्ये आल्या असता, त्यांनाच कुऱ्हाडीचा घाव लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी मेहक सय्यद ही देखील मध्ये पडल्याने तिलाही जबरी मार लागला.

त्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून पळून गेले. त्यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी मुन्ना पठाण यांना फोनवरून घटनेची माहिती दिली त्यानंतर मुन्ना पठाण हे तेथे पोहोचले. तेव्हा आई व भाचा साहील तसेच भाची महेक त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते कारण त्यांच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. त्यांना त्वरित श्रीरामपूरातील साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले.

त्यानंतर प्रकृती चितांजनक असल्याने त्यांना लोणी येथे नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच शम्मा पठाण मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. या खून प्रकरणी आकाश इंद्रभान बर्डे आणि एक अल्पवयीन मुलगा, अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुन्ना पठाण यांच्या फिर्यादीवरून आकाश बर्डे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत. या खून प्रकरणात नाजूक कारण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खुनाच्या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे

यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तेथे श्वानपथक आणि फॉरेन्सिक टिमलाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या तत्काळ आवळल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, सपोनि. हेमंत थोरात, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe