मेजर सिता शेळकेच्या कर्तबगारीचा प्रवरेलाही अभिमान, मंत्री विखे पाटील यांनी केले अभिनंदन!

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

केरळ राज्यातील वायनाड येथील नैसर्गिक संकटात आपल्या कुशल बुध्दीने केवळ ३१ तासांत सेतू उभा करणा-या लष्कर सेवेतील सीता शेळके या प्रवरेच्या माजी विद्यार्थीनीने दाखवलेल्या कर्तबगारीचा प्रवरा परीवाराला सार्थ अभिमान असल्याची भावना पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

प्रवरा अभियात्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी असलेली सिता अशोक शेळके सध्या लष्करी सेवेत आहेत. केरळ मधील वायनाड येथे पावसाने ओढवलेल्या नैसर्गिक संटकात मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखालील टिमने अवघ्या ३१ तासात पुलाची उभारणी करून मदत कार्यासाठीचा मार्ग सुकर करून दिला.मेजर सीता शेळके यांच्या टिमने दाखवलेल्या तत्परतेने पुरग्रस्तांना मोठी मदत झाली.

या सर्व प्रक्रीयेत आपले कर्तृत्व दाखवणाऱ्यासीता शेळके या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थीनी असून संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१० साली मॅकेनिकल विभागातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्याची माहीती प्राचार्य डॉ गुल्हाणे यांनी दिली.

मोठ्या प्रमाणात वायनाड येथे झालेल्या पावसाने आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करण्यासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती.

ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले. या तुकडीचे नेतृत्व या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके यांच्याकडे होते.

सिता शेळके यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे आणि त्यांच्या टिमच्या कार्याचा मोठा अभिमान प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेस असून, देश सेवे बरोबरच लष्काराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अतिशय धैर्याने बजावणार्या सीता शेळके आणि त्यांच्या टिमचे मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहै.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe