Parner Vidhan Sabha : विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी, युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचे कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या. आता पारनेर मतदार संघाचा जर विचार केला तर येथे महायुतीकडून जितकी रस्सीखेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील. सध्याच्या गणितानुसार महायुतीकडून पाच तर माविआ कडून तिघे इच्छुक उमेदवार येथे असतील असे चित्र आहे. महाविकास आघाडीचा विचार जर केला तर येथे शरद पवारगटाचा दावा राहील असे दिसत आहे. येथे शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांचेच नाव सध्या चर्चेत आहे. पण राणीताई लंके यांचा विजय खरोखर सोपा आहे का? असा प्रश्न पडायचे कारण म्हणजे पारनेर मतदार संघातील दोन चेहरे.यातील एक चेहरा लोकसभेला निलेश लंकेंसोबत होता. तर दुसरा विरोधात. ही नावे म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले. व माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे. राणीताई लंके यांचा विजय अवघड आहे का? संदेश कार्ले यांचे बंड,सुजित झावरे पाटील यांचे परफेक्ट प्लॅनिंग लंके यांना जड जाईल का? कार्ले, झावरे नेमके काय करू शकतात याचाच हा स्पेशल रिपोर्ट..
पारनेर मतदार संघात निलेश लंके हे आमदार होते. लोकसभेला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व त्यांतर ते अहमदनगर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाकडून उभे राहिले व निवडून आले. त्यामुळे आता पारनेर मध्ये खा. निलेश लंके यांचे निर्विवाद वर्चस्व आहे असे म्हटले जाते. परंतु विधानसभेला राणी ताई लंके यांचे नाव समोर आले तरी ही फाईट नक्कीच सोपी नाही. याचे कारण म्हणजे या मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले ठकरे गटाकडून इच्छुक आहेत. आता नगर तालुक्याचा विचार जर केला तर ज्येष्ठ नेते शशिकांत गाडे सर, संदेश कार्ले, कार्ले यांचे निकटवर्तीय बाळासाहेब हराळ यांचे मोठे वलय आहे.
हे सगळे लोकसभेला लंके यांच्या पाठीशी होते. त्याचा फायदा नक्कीच लंके यांना मताधिक्य मिळवण्यात झाला. तसेच पारनेर मध्ये देखील शिवसैनिकांचे एक शिकी मतदान आहे. तसेच लंके यांना लोकसभेला प्रामाणिक मदत केली त्यामुळे लंके देखील त्यांचं काम करतील. म्हणजे विजय सोपा आहे असे त्यांचे गणित आहे. परंतु जर त्यांना डावलण्यात आले तर ते पारनेर मध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांच्यासारखे अपक्ष उभे राहू शकतात. किंवा संधी मिळालीच तर अजित पवार गट किंवा शिंदेची शिवसेना या पक्षाशीही ते चाचपणी करतील अशी चर्चा आहे. परंतु त्यांच्यातील कट्टर शिवसैनिक पाहता ते इतर पक्षात जाण्यापेक्षा अपक्ष उभा राहण्याची किंवा शिन्दे गटाकडून उभे राहण्याची शक्यता जास्त वाटते.
आता जर असं झालं आणि राणीताई लंके व संदेश कार्ले फाईट झाली तर मात्र ही फाईट अत्यंत टाइटफाईट होईल. याचे कारण म्हणजे नगर तालुक्याचा विचार जर केला तर ज्येष्ठ नेते शशिकांत गाडे सर, संदेश कार्ले, कार्ले यांचे निकटवर्तीय बाळासाहेब हराळ यांचे मोठे वलय आहे. तसेच पारनेर मध्ये देखील शिवसैनिकांनाचे एक शिकी मतदान आहे ते कार्ले यांच्या पाठीशी ऐनवेळी उभा राहू शकते. घोसपुरी पाणी योजनामध्ये कार्ले यांनी दिलेले मोठे योगदान असेल किंवा झेडपी सदस्य असताना केलेली विकासकामे असतील किंवा मग अत्यंत नम्र स्वभाव व २४ तास जनतेला उपलब्ध असणारा नेता अशी त्याची छबी असेल याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. तसेच जनतेत कट्टर व एकनिष्ठ शिवसैनिक असणाऱ्या कार्ले यांच्यावर अन्याय झालाय अशा पद्धतीची यांच्याविषयी सहानुभूतीत निर्माण झाली तर या सहानुभूतीच्या लाटेचाही फायदा त्यांना होणारही नक्की.
तसेच ऐनवेळी लंके यांना पराभूत करण्यासाठी त्यांना कर्डीले व विखे हे देखील आपल्यापद्धतीने मदत करू शकतात हे देखील तितकेच खरे. तसेच निलेश लंके यांच्या पाठीशी लोकसभेला शिवसैनिकांची ताकद होती त्यामुळे त्यांना पारनेरमध्ये मताधिक्य मिळण्यात मदत झाली हे देखील वास्तव आहे. आता ते मतदार संदेश कार्ले यांच्या पाठीशी उभे राहील हे देखील नाकारता येणार नाही. म्हणजे मागील विधानसभेला लंके यांच्या पाठीशी असणारे अखंड राष्ट्रवादीची मते देखील यंदा फुटली जाणार. अजित पवार गटाचे मतदार लांकेयांच्या पासून दुरावली जाणार.त्यातच शिवसैनिकांचे मतेही जर कारले यांच्याकडे गेली तर मग लंके यांचे मताधिक्य कमी होतेहे देखील नक्की. पण आता दुसरीकडे खा. निलेश लंके व राणीताई लंके यांचाच देखील संपर्क काही कमी नाही. लंके यांच्या शब्दावर जीवाचे रान करणारी जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे ही फाईट अत्यंत तुल्यबळ होईल हे नक्की.
आता दुसरा चेहरा म्हणजे सुजित झावरे पाटील. सुजित झावरे पाटील यांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे. जर महाविकास आघाडीत कुणी बंडखोरी केली नाही. सर्वानुमते राणीताई उभ्या राहिल्या तर त्यांच्या विरोधात सुजित झावरे पाटील हे देखील असू शकतात. पारनेर तालुक्याचा विचार जर केला आज शेकडो गावात शेकडो विकासकामे त्यांनी केली आहेत.सत्तेत असो किंवा नसो त्यांनी सर्वच नेत्यांना नम्रतेने हाताशी धरत, प्रसंगी जनतेसाठी नेत्यांचे पाय धरत विकासकामे आणली आहेत. कोट्यवधींची विकासकामे आज त्यांच्या प्रयत्नातून सुरूआहेत. तसेच एक निष्ठावन्त कार्यकर्त्यांची फळी त्यांना लाभलेली आहे. चमकोगिरी न करणारा एक नम्र नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. जलसंवर्धनच्या बाबतीत त्यांचे काम कौतुकास्पद आहे.
पारनेरमध्ये जलसंवर्धनची मुहूर्तमेढ झावरे कुटुंबानी रोवली असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती व आदर असणारा एक मोठा वर्ग आहे. आता राहिला विषय नगर तालुक्याचा तर येथे त्यांना माजी आ. कर्डीले यांची साथ मिळू शकते. तसेच विखे पॅटर्नही त्यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अखंड महाविकास आघाडीची ताकद व स्वतः खा.लंके यांची यंत्रणा व दुरीकडे प्लेन चेहरा सुजित झावरे पाटील व महायुतीची ताकद असेल त्यामुळे ही फाईट देखील टाईट होईल हे देखील नक्की. दरम्यान महायुतीकडून सध्या काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड आदींची नावे चर्चेत आहेत.