कशाला विकत घेतात 7 सीटर कार? ‘या’ 8 सीटर कार ठरतील तुमच्यासाठी बेस्ट पर्याय, वाचा भारतातील 8 सीटर कारची यादी

Ajay Patil
Published:
8 seater car

जेव्हा आपण कार घ्यायला जातो तेव्हा प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करत असतो. यामध्ये आपला आर्थिक बजेट आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या प्रामुख्याने पाहिली जात असते. या दोन गोष्टींच्या दृष्टिकोनातून किंवा कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येच्या दृष्टिकोनातून जर कार घ्यायचा विचार कोणी करत असेल तर प्रामुख्याने 7 सीटर कार घ्यायला पसंती दिली जाते.

जर आपण भारतीय कार बाजारपेठ पाहिली तर भारतामध्ये 7 सीटर कारची एक मोठी यादी तयार होईल. या व्यतिरिक्त भारतामध्ये 8 सीटर कार देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर लॉन्च करण्यात आलेले आहेत.

विशेष म्हणजे काही 8 सीटर कार या मध्यमवर्गीय लोकांना देखील आर्थिक दृष्टिकोनातून खरेदी करता येतील अशा किंमतीमध्ये मिळतात. त्यामुळे या लेखात आपण अशाच आठ सीटर कारची यादी बघणार आहोत.

 या आहेत भारतातील उत्तम आठ सीटर कार

1- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही किमतीला जरा महाग आहे. परंतु तिची गुणवत्ता आणि विश्वासार्हता ही मोठ्या प्रमाणावर आहे. या कारमध्ये तुम्हाला आरामदायी राईड तसेच प्रशस्त इंटिरियर मिळते.

ही कार सात आणि आठ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असून इनोव्हा क्रिस्टाच्या आठ सीटर व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते. देशामध्ये ज्या काही सर्वाधिक एमपीव्ही विकल्या जातात त्यामध्ये या कारचा समावेश होतो.

2- महिंद्रा Marazoo- महिंद्राच्या या कार मध्ये तुम्हाला एक मोठी केबिन तसेच मधल्या रांगेमध्ये कॅप्टन सीट्स आणि चांगले मायलेज देखील मिळते. या कारची किंमत 14.10 लाख रुपयांपासून सुरू होते.

जर आपण या कारचे इंजिन बघितले तर ते 1.5 लिटर डिझेल इंजिन असून जे 122 पीएस/ तीनशे एनएम टॉर्क जनरेट करते. हे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते व फक्त डिझेल इंजिनसह येते.

3- किया कार्निवल कियाची ही एक प्रसिद्ध असलेली आठ सीटर कार असून या कारमध्ये 2199 सीसी डिझेल इंजन मिळते. हे इंजिन 197 बीएचपी च्या कमाल पॉवर सह 440 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 40 लाख रुपयापासून सुरू होते आणि 45 लाखांपर्यंत जाते.

4- मारुती इन्वीक्टो मारुतीच्या इन्व्हिक्टोमध्ये तुम्हाला सात सीटर आणि आठ सीटर दोन्ही पर्याय मिळतात. यामध्ये फक्त एक पावर ट्रेन असून हायब्रीड सेटअपसह दोन लिटर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आला आहे.

मारुती इनविक्टो ही ईनोवा हायक्रॉसवर आधारित एमपीव्ही असून तिची आठ सीटर व्हेरियंटची किंमत 24.84 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe