सध्या कार बाजारपेठेमध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी कमीत कमी किमतीत परवडणाऱ्या अशा अनेक सेगमेंटमध्ये कार लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे एखादा ग्राहक जेव्हा कार घ्यायला जातो तेव्हा तो त्याच्या बजेट मधील आणि चांगले वैशिष्ट मिळतील अशा कारच्या शोधात असतात.
परंतु अनेक नामांकित कंपन्यांनी बाजारपेठेमध्ये कार लॉन्च केल्याने कार निवडीमध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो. या सगळ्या कारमध्ये नेमके कोणती कार चांगली किंवा कोणती कार आपल्यासाठी बेस्ट राहील? याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.
या दृष्टिकोनातून आपण या लेखामध्ये मारुतीची एर्टिगा आणि टोयोटा रुमीयन या दोन कारची माहिती घेणार आहोत. या दोन्ही कार पाहिल्या तर दिसायला एक सारख्याच दिसतात.
जास्त करून या दोन्ही कारच्या पुढच्या भागांमध्ये बऱ्याच प्रकारचे साम्य आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण या दोन्ही कारची तुलनात्मक दृष्ट्या माहिती थोडक्यात घेणार आहोत.
या दोन्ही कारची सारखी वैशिष्ट्ये
टोयोटा रोमीयन ही कार काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेली असून ती मारुती एर्टिगा सारखेच दिसते. खासकरून या दोन्ही कारचा जो काही फ्रंट स्पेस आहे किंवा पुढचा भाग आहे तो एकसारखा आहे. तसेच या दोन्ही कारचे इंजिन आणि त्याचे ट्रान्समिशन देखील एकसारखे असून या दोन्ही सात सीटर कार आहेत.
या कारमध्ये 1.5 लिटर के सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 6000 आरपीएम वर 101.65 बीएचपीची पावर 4400 rpm वर 136.8 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या कारचे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सहज जोडलेले असून पेट्रोल मोडमध्ये 20.51 किलोमीटर प्रति लिटर तर सीएनजी मध्ये 26.11 किलोमीटरचे मायलेज देते.
मारुती एर्टिगाची वैशिष्ट्ये
मारुती एर्टिगा मध्ये देण्यात आलेली फीचर बघितली तर यामध्ये सात इंचाचा स्मार्ट प्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान देण्यात आलेल्या आहे व त्यासोबतच अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्लेचा सपोर्ट देखील मिळतो.
तसेच ऑटो हेडलॅम्प, पेडल शिफ्टर्स, क्रुझर कंट्रोल आणि ऑटो एसी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्युअल ऍडबॅग्स, रियर पार्किंग सेन्सर्स व ब्रेक असिस्ट व त्यासोबत ईबीडीसह एबीएस देखील देण्यात आलेला आहे.
टोयोटा रुमीयनची वैशिष्ट्ये
टोयोटा रुमियनमध्ये टच स्क्रीन सिस्टम टोयोटाच्या इंटरफेस आहे ते व तुम्ही तुमच्या स्मार्टवॉच वरून ते नियंत्रित करू शकतात. या कारमध्ये सेंट्रल लॉकिंग, फ्रंट लॉग लॅम्प, रियर पार्किंग कॅमेरा तसेच रियर पार्किंग सेन्सर,
सिक्युरिटी अलार्म, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारख्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
किती आहे मारुती एर्टिगाची किंमत?
या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 64 हजार रुपये आहे तर टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 13 लाख 8 हजार रुपये इतकी आहे.
किती आहेत टोयोटा रूमीयनची किंमत?
ही कार सहा व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आलेली असून ती सात सीटर कार आहे व या कारची किंमत सुमारे दहा लाख 29 हजार रुपये आहे तर टॉप व्हेरियंटची किंमत 13 लाख 68 हजार रुपये आहे.